शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज शिवसेना उपनेते आणि शिवसेनाभवन येथील लोकप्रिय जनता दरबारमुळे सर्वश्रुत झालेले नितीन नांदगावकर यांच्या राजकीय कारकिर्दीवरील ,“शिवसेनेचा रॉबिनहूड नितीन नांदगावकर” ह्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले . “या पुस्तकातील नितीनची कथा मी वाचली आहे आणि ती प्रेरणादायी आहे . शिवसैनिकांकडून अशीच जनसेवा अपेक्षित असते .” असे या प्रसंगी उद्धव ठाकरे म्हणाले.
पुस्तकाचे लेखन ज्येष्ठ पत्रकार विजय सामंत यांनी केले आहे. तर प्रकाशक अरविंद शाह आणि जयंत प्रिंटरी हे आहेत. पुस्तकासाठी छायाचित्र वरिष्ठ छायाचित्रकार सचिन वैद्य आणि शैलेश आचरेकर यांनी काढली असून पुस्तकाचे संपादन अॅड हर्षल प्रधान यांनी केले आहे .
या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमांस शिवसेना नेते सुनील प्रभू , शिवसेना आमदार सर्वश्री अजय चौधरी, रमेश कोरगावकर , शिवसेना उपनेते भाऊ कोरगावकर , शिवसेना उपनेत्या किशोरी पेडणेकर सुषमाताई अंधारे , अस्मिताताई गायकवाड , शिवसेनेचे उपनेते आणि ज्यांच्यावर पुस्तक प्रकाशित झाले ते नितीन नांदगावकर आणि शिवसेना जनसंपर्कप्रमुख आणि प्रवक्ता अॅड. हर्षल प्रधान आदी उपस्थित होते.