Breaking News

दुःखद बातमी ! जगातील सर्वात मोठ्या फिल्म शूटिंग स्टुडिओच्या मालकांचं निधन

झगमगत्या विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. फिल्मी उद्योग क्षेत्रातील दिग्गज व्यक्तीच्या निधनामुळे कलाविश्वात शोककळा पसरली आहे. रामोजी फिल्म सिटीचे संस्थापक रामोजी राव यांचं आज सकाळी हैदराबाद, तेलंगणा येथे निधन झाले. रामोजी राव यांचा हैदराबाद येथील स्टार रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. पहाटे 3.45 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वयाच्या 83 व्या वर्षी रामोजी राव यांनी अखेरचा श्वास घेतला…

रामोजी राव यांच्या कुटुंबाविषयी सांगायचं झालं तर, त्यांच्या पत्नीचे नाव रमा देवी असून त्यांना दोन मुले होती. लहान मुलगा चेरुकुरी सुमनचा 2012 मध्ये रक्ताच्या कर्करोगाने मृत्यू झाला. किरण प्रभाकर असं त्यांच्या मोठ्या मुलाचं नाव आहे. रामोजी राव यांच्या निधनामुळे कुटुंबावर दुःखाचं डोंगर कोसळलं आहे.

रामोजी राव यांचं खरं नाव चेरूकुरी रामोजी राव असं होतं. त्यांच्या जन्म 16 नोव्हेंबर 1936 मध्ये एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला होता. रामोजी राव यांनी व्यवसाय आणि इंडस्ट्रीमधून प्रसिद्धी आणि लोकप्रियता मिळावली. सिनेविश्वात काम करत असताना त्यांनी रामोजी ग्रुपची स्थापना केली, ज्यामध्ये जगातील सर्वात मोठा फिल्म स्टुडिओ रामोजी फिल्म सिटी, ईटीव्ही नेटवर्क, डॉल्फिन हॉटेल्स, मार्गदर्शी चिटफंड आणि ईनाडू तेलुगु वृत्तपत्र यांचा समावेश आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रामोजी राव यांच्याकडे 4.7 अरब डॉलरची संपत्ती होती. ही रक्कम भारतीय चलनानुसार जवळपास 41,706 कोटी रुपये आहे. रामोजी राव यांचा एक प्रॉडक्शन हाऊस देखील आहे. ज्याचं नाव ऊषाकिरण मूव्हिज आहे. ऊषाकिरण मूव्हिज बॅनरखाली त्यांनी अनेक सुपरहिट तेलुगू सिनेमे दिले आहेत.