kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

सखी गोखले आणि सुव्रत जोशी पुन्हा एकत्र भेटायला येणार ; नवं कोर नाटक घेऊन पुन्हा रंगभूमीवर परतणार

सखी गोखले आणि सुव्रत जोशी ही जोडी कायम प्रेक्षकांच्या मनात घर करून राहिली आहे. दुनियादारी मालिकेतून एकत्र काम करून यांची जोडी ‘अमर फोटो स्टुडिओ’मध्ये दिसली होती आणि आता पुन्हा सखी सुव्रत नव्या नाटकासाठी एकत्र येणार आहेत. हल्लीची पिढी त्यांच्या गोष्टी आणि यातून घडणारी गंमत दाखवण्यासाठी सखी सुव्रत एक नवं कोर नाटक घेऊन पुन्हा रंगभूमीवर परतणार आहेत. ‘वरवरचे वधू वर’ अस या नाटकाचं नाव असून ही जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज होत आहे.

‘वरवरचे वधू वर’ या नाटकाचं लेखन आणि दिग्दर्शन विराजस कुलकर्णी याने केलं आहे. सखी आणि सुव्रतने सोशल मीडियावर या बद्दल ची पोस्ट शेयर करून ही खास गोष्ट प्रेक्षकांना सांगितली आहे. प्रेक्षक या जोडीला पुन्हा एकत्र बघण्यासाठी उत्सुक आहेत आणि सखी सुव्रत यांची ही बिन प्रेमाची भानगड नक्की काय असणार हे अनुभवण्यासाठी आतुर आहेत.

सखी गोखले हिने नव्या नाटकाची पोस्ट करत लिहिलं ‘वरवरचे – वधू वर बिन प्रेमाची लव स्टोरी’ आता नाटकाचा विषय नक्की काय असणार? अजुन कोण कलाकार यातून दिसणार? आणि हे नाटक कधी प्रेक्षकांच्या भेटीला येणार? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं लवकरच प्रेक्षकांना मिळतील, असं देखील सखीने सांगितलं आहे. जोडीदार शोधणारे मादी आणि नर, वर्षानुवर्षे ज्यांनी थाटले आहे घर, आशिर्वादासाठी ज्यांचे हवेत आहेत कर, मुलांच्या काळजीने ज्यांना लागली आहे घरघर, अश्या सगळ्यांना हवे आहे मनोरंजन जर, नवे आमचे नाटक…, असं म्हणत सखीने ही पोस्ट शेअर केलीय.