सगळ्यात मोठी बातमी समोर येत आहे. मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी सीआयडीने न्यायालयात सादर केलेल्या आरोपपत्रातून आणखी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. वाल्मिक कराड याच्याकडे असलेला प्रचंड पैसा आणि त्याच्या श्रीमंतीचा तपशील समोर आल्यामुळे वाल्मिक कराड याचा पाय आणखी खोलात जाण्याची शक्यता आहे. आरोपपत्रातील या नव्या माहितीनुसार, पोलिसांनी वाल्मिक कराड याची सगळ्या मालमत्तेचा तपशील खणून काढला आहे. वाल्मिक कराड याच्याकडे तीन आयफोन होते. संतोष देशमुख हत्याप्रकरणानंतर वाल्मिक कराड याने या तिन्ही आयफोनमधील डेटा डिलिट केला होता मात्र, एसआयटी पथकाने तंत्रज्ञांची मदत घेऊन हा डेटा रिकव्हर केला.
वाल्मिक कराड याच्या राज्यात अनेक ठिकाणी मालमत्ता आहेत. पुण्यात सर्वात हायप्रोफाईल समजल्या मगरपट्टा सिटी आणि एफसी रोड भागात वाल्मिक कराड याची जवळपास 115 कोटीची संपत्ती असल्याची माहिती आहे. याशिवाय, वाल्मिक कराड याच्याकडे अनेक महागड्या गाड्याही असल्याची माहिती समोर आली आहे. या गाड्या जप्त करण्यासाठी पोलिसांनी न्यायालयात अर्ज केला आहे.
वाल्मिक कराडला त्याचे चेले अण्णा आणि त्याच्या सोशल मीडियावरील फॉलोअर्स त्याला पंटर किंग म्हणायचे. खंडणीखोर वाल्मिकचे थाट पण राजेशाहीच होते. पायात कधीच चप्पल न घालणारा वाल्मिक मोबाईलचा मात्र भलताच शौकीन होता. वाल्मिक हा एकूण तीन महागडे आयफोन वापरत होता. वाल्मिक हा आयफोनच्या लक्झरी सीरीजमधील गोल्ड फोन वापरत होता. वाल्मिकचे सध्या तपासासाठी पोलिसांनी तीन आयफोन जप्त केले आहे. सध्या वाल्मिक कराड गोल्डन रंगाचा आयफोन 16 प्रो वापरत होता. तसेच त्याच्याकडे एक गोल्डन रंगाचा आयफोन प्रो 13 देखील होता. तिसरा आयफोन 13 प्रो फिक्कट निळ्या रंगाचा होता. वाल्मिकचा गोल्डन रंगाचा आयफोन 16 प्रो या फोनची किंमत साधारण तीन लाखापर्यंत आहे. इतर फोन दीड ते दोन लाखांच्या घरात आहे.
वाल्मिक कराड याच्याकडे कोणत्या महागड्या गाड्या?
फोर्ड इंडेव्हर MH-44/T-0700
अशोक लेलँड लि.(हायवा) MH-44/U-0700
जॅग्वार लैंड रोवर इंडिया MH-44/AC-0700
जेसीबी इंडिया लिमिटेड MH-44/S-7450
मर्सीडीझ बेन्झ इंडिया प्रा.ले. MH-44/Z-0007
बीएमडब्लु इंडिया प्रा. लि. MH-44/AC-1717
अशोक लंयलँड लि.(हायवा) MH-44/U-1600
सुदर्शन घुलेकडे कोणत्या गाड्या होत्या?
कंपनी – टोयोटो इनोवा गाडी क्र. ME-44/AB-1717
ट्रॅक्टर (महिंद्रा & महिंद्रा नि.) MH-44/D-4512
ट्रॅक्टर (महिंद्रा & महिंद्रा नि) MH-44/S-6973