छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार मनिष आनंद यांनी प्रचारात मोठी आघाडी घेतली आहे. काल येरवडा येथे त्यांनी एका भव्य कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन केले होते, त्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
यावेळी येरवडा येथील कार्यकर्ते लखन परदेशी, लखन पवार, ब्रिजदीप सिंग शर्मा, अखलाक धवलजी, अशफाक धवलजी, निरंजन कांबळे, अमोल दुबे, श्लोक, आदर्श भोसले, गिरीश सोनार आदी उपस्थित होते.
मनिष आनंद यांनी येरवड्यातील नागरिकांच्या दैनंदिन जीवन प्रभावित करणाऱ्या ड्रेनेज सिस्टम, स्वच्छता आणि आरोग्य सुविधा, वाहतूक समस्या, अनियोजित पायाभूत सुविधा, तरुणां मधील बेरोजगारी या समस्यांवर प्रकाश टाकला. याप्रसंगी बोलताना मनिष आनंद म्हणाले, “मी इथे फक्त भाषणे करायला आलेलो नाही. मी नागरिकांच्या समस्या ऐकण्यासाठी, समजून घेण्यासाठी आणि कृती करण्यासाठी येथे आलो आहे. आपण मिळून येरवडा तयार करू ज्याचा आम्हा सर्वांना अभिमान वाटेल – एक येरवडा ज्यामध्ये आधुनिक पायाभूत सुविधा, कार्यक्षम आरोग्यसेवा आणि प्रत्येक रहिवाशासाठी स्वच्छ, सुरक्षित वातावरण असेल.”
तसेच आज सकाळी मनिष आनंद यांच्या प्रचारार्थ नरवीर तानाजी वाडी परिसरात पदयात्रा काढण्यात आली, याप्रसंगी आनंद यांनी वाहतूक कोंडी, स्थानिक युवकांना रोजगार, अनियोजित विकास यावर तोडगा काढण्यासाठी मला निवडून द्या असे आवाहन केले. यावेळी स्थानिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.