kshitij Magazine & News

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

टीम इंडिया करदे सबकी.. भारताच्या विजयगीताची जगानं घेतली दखल, Video पाहाल तर वाटेल अभिमान

भारताने वर्ल्ड कप जिंकत इतिहास रचला. पण त्यानंतर आता भारतीय संघाचं विजयगीत हे जोरदार व्हायरल होतं आहे. चार वर्षांपूर्वी हे विजयगीत बनवण्यात आलं होतं. पण यावेळी ते म्हणण्याचा योग भारतीय संघासाठी आला. भारताच्या या विजयगीताचा व्हिडिओ जोरदार व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ ऐकल्यावर भारतीयांना अभिमान तर वाटेल, पण त्याचबरोबर अंगात स्फुरणही चढेल.

‘आम्ही चार वर्षांपूर्वी ठरवले होते की, वर्ल्ड कप जिंकलो की संघाचे हे गाणे एकत्र गायचे. अन् आज तो क्षण आला आहे…’, असे म्हणत भारतीय क्रिकेट संघाची मुंबईकर फलंदाज जेमिमा रॉड्रिग्ज हिने सूर लावला. ज्याला साथ लाभली ती संघातील इतर खेळाडू आणि सहाय्यक वर्गातील सदस्यांची. वर्ल्ड कप भारताने जिंकला आणि त्यानंतर मैदानात सर्व खेळाडूंनी जोशात हे विजयगीत गायले आणि संपूर्ण जगाला त्याची दखल घ्यावी लागली.

टीम इंडिया, टीम इंडिया करदे सबकी हवा टाइट टीम.. इंडिया इज, हीअर टू फाइट कोई ना लेता हमको लाइट और हमारा फ्युचर है ब्राइट चांद पे चलेंगे, साथ मे उठेंगे हम है टीम इंडिया, साथ मे जितेंगे ना लेगा कोई पंगा, कर देंगे हम दंगा रहेगा सबसे उपर, हमारा तिरंगा… हे गाणे एका सूरात गाणाऱ्या हरमनप्रीत कौरच्या भारतीय संघाचा व्हिडीओ बीसीसीआयतर्फे सोशल मीडियावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.