जगभरामध्ये फुटबॅाल चाहते असो किंवा क्रिकेट चाहते अनेकदा त्याच्या आवडत्या खेळाडूंना भेटण्यासाठी नेहमीच उत्साही पाहायला मिळतात. भारतामध्ये क्रिकेट खेळाडूंना अनेक चाहते हे देवासारखे पूजतात तर जगभरामध्ये असे काही फुटबॅाल खेळाडू आहेत त्यांना चाहते हे सर्वस्व मानतात. आता सुरु असलेल्या फुटबॅाल विश्वचषकाचा जगभरामध्ये चर्चा पाहायला मिळत आहे. तीन देशांनी या स्पर्धेचे संयुक्तपणे आयोजन केले आहे, फुटबॅाल विश्वचषक 2026 मध्ये राऊंड ऑफ 32 चे सामने हे सुरु आहेत.
आता बाद फेरीचे सामने सुरु होते आणि बुधवारी बेल्जियम आणि सेनेगल यांच्यामध्ये राउंड ऑफ 32 चा सामना पार पडला, या सामन्यामध्ये स्टेडियममध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बेल्जियम आणि सेनेगल यांच्यामध्ये विश्वचषकाचा सामना सुरु असताना सामन्यादरम्यान तीन जण मैदानात अचानक घुसले. ज्यामुळे काही काळ खेळ थांबवावा लागला होता. मैदानावरील या व्यक्तींनी 32 व्या मिनिटाला खेळात व्यत्यय आणला, ज्यामुळे सुमारे डझनभर सुरक्षा रक्षकांना त्यांना मैदानाबाहेर काढावे लागले. या घटनेदरम्यान बेल्जियमचा बचावपटू मॅक्सिम डी कुइपरच्या हातात चेंडू होता.
विश्वचषकाच्या बेल्जियम आणि सेनेगल सामन्यामध्ये हबीब दियाराने 25व्या मिनिटाला केलेल्या गोलमुळे सेनेगल बेल्जियमवर 1-0 ने आघाडीवर होता. सर्वोत्तम तिसऱ्या क्रमांकाच्या संघांपैकी एक म्हणून सेनेगल बाद फेरीसाठी पात्र ठरला. हा संघ सर्वात कठीण गटांपैकी एक होता आणि यामध्ये फ्रान्स आणि नॉर्वेसारख्या संघांचाही समावेश होता. सुरुवातीच्या सामन्यामध्ये दोन गोल आघाडी घेऊनही सेनेगलच्या संघाला पराभवाचा सामना करावा लागला. सेनेगलचे प्रशिक्षक पापे थियाव म्हणाले, “मला या निर्णयावर स्पष्टीकरण द्यायचे नाही. पेनल्टी देण्याबाबत आम्हा सर्वांची वेगवेगळी मते आहेत. मला त्यावर भाष्य करायचे नाही किंवा पंचांच्या निर्णयाचा अर्थ लावायचा नाही.”
गेल्या 11 विश्वचषकांमध्ये दोन किंवा अधिक गोलने पिछाडीवर असूनही पुनरागमन करून बाद फेरी गाठण्याची बेल्जियमची ही केवळ दुसरीच वेळ होती. 2018 च्या स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत जपानविरुद्ध 3-2 ने विजय मिळवतानाही बेल्जियमने असेच केले होते. रशियामध्ये तिसऱ्या स्थानावर राहिलेल्या बेल्जियन संघातील अनेक प्रमुख खेळाडूंनी बुधवारच्या विजयात मोलाची भूमिका बजावली.








Leave a Reply