सप्टेंबर रोजी रात्री 9 वाजता अलीकडच्या ऑलिंपिकमध्ये दोन दोन कांस्य पदके जिंकून देशाचा गौरव वाढवणाऱ्या शूटर मनू भाकरचा सत्कार करण्यात येईल, जेव्हा सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील कौन बनेगा करोडपती 16 या अत्यंत लोकप्रिय रियालिटी क्विझ शोमध्ये मनू हॉट सीटवर विराजमान झालेली दिसेल. KBC च्या ‘जीत का जश्न’ नामक या भागात मनूसोबत पॅरिस ऑलिंपिकमध्ये कुस्तीत पदक जिंकणारा अमन सेहरावत हा सर्वात युवा भारतीय व्यक्तीगत पदक विजेता देखील उपस्थित असेल. या भागात मनू 2024 पॅरिस ऑलिंपिकमधला आपला ऐतिहासिक प्रवास सांगताना चिकाटी आणि विजयाच्या प्रेरणादायक गोष्टी सांगताना दिसेल.
‘कौन बनेगा करोडपती’मध्ये एका भावुक क्षणी, शूटिंग सारख्या खेळात दाखल होण्यामागे प्रेरणा काय होती असा प्रश्नविचारल्यावर मनू भाकरने सांगितले की, तिची आई हीच तिची सर्वात मोठी प्रेरणा होती. आपल्या बालपणाविषयी बोलताना तिने सांगितले की, आपल्या कारकिर्दीला आकार देण्यात आणि तिला आधार आणि प्रोत्साहन देण्यात तिच्या आईची सर्वात मोठी भूमिका होती. लहान असताना शाळेतल्या अथ्लेटिक्समध्ये मनूची विशेष रुची होती. खेळात जिंकणे ही तिला सर्वात मोठी सिद्धी वाटत असे. तिच्या स्पर्धात्मक स्वभावामुळे वेगवेगळे खेळ ती खेळू लागली. हारल्यावर ती खूपच नाराज होत असे. हळूहळू जशी मनू मोठी झाली आणि ऑलिंपिकविषयी तिला समजले, तेव्हा त्या स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकण्याचे स्वप्न ती बघू लागली. अधिक सशक्त बनण्याच्या इच्छेमुळे ती शूटिंग या खेळाकडे
वळली. तिच्या या निर्णयाला तिच्या आईने भक्कम साथ दिली. मनूच्या यशस्वी होण्याच्या प्रवासात तिच्या आईचे प्रेम आणि मनूवरील तिचा विश्वास ठळकपणे दिसून येतो.
आपली प्रेरणा काय होती, याविषयी बोलताना भारत की बेटी – मनू भाकर म्हणाली, “माझी आई ही माझी सगळ्यात मोठी प्रेरणा होती. तिला स्वतःला अॅथ्लीट व्हायचे होते, पण तिला साथ देणारी संसाधने तिच्याकडे नव्हती. अॅथ्लीट म्हणून आपली किती प्रगती झाली असती, याची तिला कल्पना नव्हती, पण ती खेळात चांगली होती. मला माझ्या आवडीनिवडी जोपसण्याची सूट तिने मला दिली होती आणि जेव्हा जेव्हा मला भीती वाटली, तेव्हा ‘काळजी करू नकोस, फक्त खेळत रहा’ असे सांगून तिने मला धीर दिला. मी आज ज्या स्थानी आहे, त्या स्थानी मला बघणे हे एका प्रकारे तिचेही स्वप्न होते. तिची अद्भुत साथ हीच माझी प्रेरणा होती. मला वाटते, जेव्हा एक आई खंबीर असते, तेव्हा तिची मुलगी निश्चितपणे खंबीर होते. नंतर मी मेरी कॉम मॅम आणि सिंधू दीदीचा खेळ बघू लागले. त्यांनीही मला खूप प्रेरित केले. त्याच वेळी मी या खेळाचा आणि ऑलिंपिकच्या मंचावर पोहोचण्याच्या माझ्या स्वप्नाचा पाठपुरावा सुरू केला.”
बघत रहा, देशाभिमान आणि ऑलिंपिक पदक जेत्यांच्या अद्भुत खेळाने भरलेला KBC 16चा एपिसोड 5 सप्टेंबर रोजी रात्री 9 वाजता फक्त सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर!