kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

हा महाराष्ट्र कधीही कोणाचा गुलाम होऊ देणार नाही ; उद्धव ठाकरे कडाडले

आज महाराष्ट्र दिवस आहे. फक्त हुतात्मांना अभिवादन करून चालणार नाही. ज्यांनी आपल्याला मुंबई, महाराष्ट्र मिळवून दिला ते आपल्याकडे बघतायत. मी शपथ घेऊन सांगू इच्छितो प्राण गेला तरी चालेल पण महाराष्ट्र जाऊ देणार नाही. महाराष्ट्र गद्दार नाही. शुरांना वंदन करायचे असते परंतु चोर आम्ही वंदिले असे भाजपचे चालू आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. महाराष्ट्र दिनानिमित्त हुतात्मा स्मारक इथं रात्री उद्धव ठाकरेंनी आदरांजली वाहिली. उद्धव ठाकरेंसोबत अदित्य ठाकरे, अनिल देसाई, संजय दिना पाटील, अरविंद सावंत, सचिन अहिर, सुनिल शिंदे उपस्थित होते. त्यावेळी ते बोलत होते.

महाराष्ट्राचा स्वाभिमान काय असतो हे लोकसभा निवडणुकीत आम्ही महाराष्ट्राच्या लुटारूंना दाखवून देऊ,असा इशारा उद्धव ठाकरेंनी दिला आहे. ज्या लोकांनी आपलं बलिदान देऊन मुंबई महाराष्ट्राला मिळवून दिली. आमचे कर्तव्य आहे त्यांना अभिवादन केलं पाहिजे. आजच मी खडकवासच्या सभेत बोललो आहे, ज्यांनी ज्यांनी रक्त सांडून आम्हाला मुंबई मिळवून दिली आणि संयुक्त महाराष्ट्र जन्माला आला हा महाराष्ट्र कधीही कोणाचा गुलाम होऊ देणार नाही. जे जे महाराष्ट्र लुटत आहेत महाराष्ट्राची अस्मिता पायदळी तुडवतात त्यांना महाराष्ट्र लुटायला देणार नाही. महाराष्ट्राचा स्वाभिमान आणि जिद्द काय असते ते येत्या लोकसभा निवडणुकीत आम्ही लुटारूंना दाखवून देऊ, असे देखील उद्धव ठाकरे म्हणाले.