kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

शिवरायांचा पुतळा कोसळला यात वैभव नाईकांचा हात? भाजप नेत्यांच्या ‘त्या’ ट्वीटनं खळबळ

‘शिवरायांचा पुतळा कोसळला यामध्ये वैभव नाईक यांचा हात तर नाही ना? पुतळा कोसळल्याच्या घटनेनंतर वैभव नाईक १५ मिनिटांत घटनास्थळी कसे पोहोचले?’ असे सवाल निलेश राणे यांनी वैभव नाईक यांच्याबद्दल उपस्थित केले आहे.

‘आत्ताच मिळालेल्या माहितीनुसार, ज्या दिवशी महाराजांचा पुतळा कोसळला तेव्हा उबाठा गटाचा आमदार वैभव नाईक हा पंधराव्या मिनिटात घटनास्थळी पोहोचला. आजूबाजूला कसलाही नियोजित कार्यक्रम नसताना आणि राहतं घर हे कणकवली शहरामध्ये जे 50 किलोमीटर लांब आहे, असं असताना घटनास्थळी पंधरा मिनिटात नाईक कसा पोहोचू शकतो??? जर काही यामधलं वैभव नाईक याने घडवलं असेल तर आत्ताच बोटीमध्ये बसून दुबई किंवा पाकिस्तानला जायची तयारी त्याने करून ठेवावी.’, असं ट्वीटच निलेश राणे यांनी करत वैभव नाईक यांच्यावर शंका उपस्थित केली आहे.