kshitij Magazine & News

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी २३ वर्षांच्या सेवेनंतर दिला राजीनामा; व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी म्हणून सुरू झाला होता प्रवास

२३ वर्षे बँकिंग क्षेत्रात काम केल्यानंतर, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी नोकरीचा राजीनामा दिला आहे. सोशल मीडियावरील एका पोस्टमध्ये अमृता फडणवीस यांनी लिहिले आहे की, २३ वर्षांपूर्वी मी एक तरुण मॅनेजमेंट ट्रेनिग म्हणून @axisbank मध्ये प्रवेश केला होता. आज मी सिनियर व्हाइस प्रेसिडेंट म्हणून नोकरी सोडत आहे, मन कृतज्ञतेने भरलेले आहे. शाखा ऑपरेशन्सपासून कॉर्पोरेट बँकिंग, ट्रेझरीपासून ग्राहक संबंधांपर्यंतचा अनुभव घेतला—ही संस्था माझे कुटुंब, शिक्षक आणि दुसरे घर बनली आहे. माझ्या सहकाऱ्यांना आणि नेत्यांना, विशेषतः MD & CEO अमिताभ चौधरी यांना सर्व पाठिंब्यासाठी धन्यवाद. ह्या सुंदर अध्यायाच्या समाप्तीपर्यंत मी आयुष्यभर टिकणारी शिकवण आणि मैत्री घेऊन निघते.
धन्यवाद, Axis Bank 🙏

  • ९ एप्रिल १९७९ रोजी नागपूरमधील एका डॉक्टर कुटुंबात जन्मलेल्या अमृता फडणवीस आता सामाजिक कार्यकर्त्या आणि गायिका म्हणून सक्रिय आहेत.
  • त्यांनी वित्त विषयात एमबीए केले आहे तसेच, त्या (under -१६) १६ वर्षांखालील राज्यस्तरीय टेनिसपटू होत्या.
  • अमृता यांनी डिसेंबर २००५ मध्ये देवेंद्र फडणवीस यांच्याशी लग्न केले. या जोडप्याला दिविजा नावाची एक मुलगी आहे.
  • अमृता यांचे फेसबुकवर १०६,०००, इंस्टाग्रामवर १.६ दशलक्ष, ट्विटरवर २३७.२,००० आणि युट्यूबवर अंदाजे ६६,००० फॉलोअर्स आहेत.
  • अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या नेशनल प्रेयर ब्रेकफास्ट-२०१७ मध्ये अमृता यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले होते.