यंदा पहिल्यांदाच देशातील सर्वात मोठी महापालिका असलेल्या मुंबई महापालिकेत भाजपने बहुमत मिळवत आपली सत्ता स्थापन केली आहे. त्यामुळे, मुंबई महापालिकेत सध्या भाजप महायुतीकडून देण्यात येणारे आदेश सर्वोतोपरी असल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र, शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरेंच्या आक्रमक भूमिकेनंतर महापालिकेच्या चार प्रस्ताव फेरविचारासाठी घेण्यात आले असून सुधार समितीत प्रशासनाने या प्रस्तावावर माघार घेतली आहे. थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच यात लक्ष घातल्याचं शिवसेना ठाकरे गटाचे आमदार मिलिंद नार्वेकर यांनी म्हटलं आहे. आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांशी फोनवरुन संवाद साधल्याची माहिती देखील मिलिंद नार्वेकर यांनी दिली. तर, हा मुंबईकरांचा विजय असल्याचे म्हणत आदित्य ठाकरेंनीही या स्थगिती निर्णयाचं स्वागत केलंय.
मुंबई महापालिकेच्या सुधार समितीत आज चार महत्त्वाचे प्रस्ताव प्रशासनाकडे फेरविचारासाठी परत आले. त्यामध्ये, सेव्हनहिल्स रुग्णालयाचे PPP मॉडेलद्वारे खासगीकरण, 5 उपनगरी रुग्णालयांतील रक्तपेढ्यांचे PPP प्रस्ताव, वांद्रे रेक्लेमेशनमधील Exhibition Centre आणि मलबार हिलमधील ग्रीन झोन बदलाचे प्रस्ताव स्थगित करण्यात आले आहेत. या सर्व प्रस्तावांवर आदित्य ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाने आक्रमक भूमिका घेत विरोध दर्शवला होता.
आदित्य ठाकरे यांच्या आक्रमक पवित्र्यानंतर सुधार समितीतील चार महत्त्वाचे आणि वादग्रस्त प्रस्ताव प्रशासनाकडे फेरविचारासाठी परत पाठवण्यात आले आहेत. यात सेव्हनहिल्स रुग्णालयाचे खाजगीकरण, 5 उपनगरीय रुग्णालयांतील रक्तपेढ्यांचा PPP प्रस्ताव, वांद्रे रेक्लमेशन येथील एक्झिबिशन सेंटर आणि मलबार हिलमधील ग्रीन झोन बदलाच्या प्रस्तावांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, कालच आदित्य ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन, ‘मुंबईच्या जमिनी लाटण्यासाठी शिंदे सेनेने हे प्रस्ताव आणले आहेत,’ असा थेट आणि गंभीर आरोप केला होता. या निर्णयानंतर राजकीय वर्तुळात नव्या समीकरणांची चर्चा रंगली आहे. सूत्रांनुसार, काल रात्री ‘मातोश्री’वरून थेट देवेंद्र फडणवीस यांना फोन गेला.
Big win for Mumbai!
Impact of our Press Conference and appeal!
After our press conference yesterday the Improvement Committee of the BMC has referred back all the proposals of:
🚨 Privatising the @mybmc ’s blood banks (always have been free and with BMC)
🚨 Converting the…
— Aaditya Thackeray (@AUThackeray) May 27, 2026
आदित्य ठाकरे यांनीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन करुन याविषयी बोलणं केल, आदित्य ठाकरेंच्या आक्षेपांनंतर आमदार मिलिंद नार्वेकर यांनी फडणवीसांना या प्रस्तावांमधील मध्यरात्री फोन करून त्रुटींची सविस्तर माहिती दिली. त्यानंतर फडणवीसांनी मध्यरात्रीच भाजप नगरसेवकांकडून अहवाल मागवला आणि प्रस्ताव मंजूर न करण्याच्या सूचना दिल्या.












Leave a Reply