मुंबईमधील वांद्रे येथे रेल्वेकडून गरीब नगरमधील अतिक्रमण हटवण्याची मोहीम सुरू आहे. अतिक्रमण हटवण्याचे काम सुरु असताना स्थानिकांनी याला विरोध केला. स्थानिकांनी आधी पोलिसांवर बाटल्या आणि दगड फेकले, यामुळे पोलिसांना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सौम्य लाठीचार्ज करावा लागला. आता या प्रकरणावर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी वांद्र्यात जाऊन भाष्य केले आहे.
किरीट सोमय्या म्हणाले की, माझी डीसीपी आणि सिनियर आफिसर यांच्या सोबत बोलणं झालं आहे. या घटनेत तीनजण जखमी झाले आहेत आणि त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सध्या परिस्थिती कंट्रोल मध्ये आहे. पण हे जे माफिया आहेत, एका बाजूला व्होट जिहाद माफिया, दुसऱ्या बाजूला लँड जिहादचे माफिया आणि तिसऱ्या बाजूला ड्रग माफिया यांना सबक शिकविला जाणार आहे. अशा प्रकारे न्यायालयच्या निर्णयावर, पोलिसांवर जर हल्ला केला तर कोणाची खैर नाही, एक एकाला जो पण यांच्या मागे आहे त्याला कठोर शिक्षा होणार. एका बाजूला हे सर्व अतिक्रमण हटविले जाणार आहे आणि ताबडतोब रेल्वे अधिकारी तिथे टर्मिनसचा विकासाचा काम सुरू करणार.
जखमींबाबत माहिती देताना सोमय्या यांनी म्हटले की, आरपीएफ आणि जीआरपीतील काही जवान जखमी झाले आहेत. त्यांना रुग्णालयात नेण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पुन्हा अतिक्रमण हटवण्याचे काम सुरु झालेला आहे. आता पोलीस आपला काम करत आहेत, परिस्थिती आता आटोक्यात आहे. गुंडे आणि माफियांची नावे लक्षात आलेली आहेत. कुठला तरी राजकीय पक्षाचा नेता उकसवायचा काम करीत आहे. पण चौकशी होणार आणि त्या राजकीय माफीयांवर कारवाई होणार. पोलिसांना मारहाण करण्यात आली त्याच्यासाठी मी आलो होतो. पण आता स्थिती आटोक्यात आहे आणि ज्यांना लागला ते ही आता सुखरूप घरी जात आहेत.












Leave a Reply