बॉलिवूडमधील प्रसिद्ध चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहर हा त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण चित्रपटांसह सोशल मीडियावरील उपस्थितीमुळेही नेहमीच चर्चेत असतो.दरम्यान, करण जोहर याने त्याच्या अकाऊंटवरून शाहरूख खानसह अनेक बॉलिवूड स्टार्स आणि जवळच्या मित्रमंडळींना अनफॉलो केलं आहे. इन्स्टाग्रामवर तब्बल १.७५ कोटी फॉलोअर्स असणाऱ्या करण जोहर याने त्याचा जवळचा मित्र असलेल्या शाहरुख खानसह अनेक अभिनेते आणि अभिनेत्रींना का अनफॉलो केलं आहे,
करण जोहरने ज्यांना अनफॉलो केलं आहे त्यांच्यामध्ये शाहरुख खानचा समावेश आहे. शाहरुख हा करणचा जवळचा मित्र मानला जातो. मात्र शाहरुख खानने करण जोहरला कधीही फॉलो केले नव्हते. शाहरुखसोबतच अनन्या पांडे, कार्तिक आर्यन, फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा आदींनाही करणने अनफ़ॉलो केलं आहे.
मात्र अनेक बॉलिवूड अभिनेते आणि अभिनेत्रींना अनफॉलो करणारा करण जोहर अभिनेत्री प्रियंका चोप्रा हिला मात्र फॉलो करत आहे. तसेच करण जोहरच्या अकाऊंटवर फॉलोविंगची संख्या घटून आता केवळ ७८ एवढी राहिली आहे.
















Leave a Reply