मुंबईच्या उपनगरीय रेल्वे सेवेच्या हार्बर मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. पनवेलहून सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकलचा डबा सीएसएमटी स्थानकाजवळ घसरला आहे. यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला आहे.

लोकलचा डबा रुळावरुन घसरल्यामुळे हार्बर सेवेच्या दोन्ही लाइनवरील वाहतुकीवर याचा परिणाम झाला आहे. दरम्यान, या दुर्घटनेमध्ये कोणत्याही प्रवाशाला दुखापत झाल्याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. समोर आलेल्या माहितीनुसार सीएसएमटी स्थानकात लोकल प्रवेश करत असतानाच लोकल रुळावरुन घसरली आहे.