एनडीएचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी मात्र आपला गड कायम राखला आहे. त्यांनी वाराणसी येथून विजयी झेंडा फडकवला आहे. नरेंद्र मोदी यांनी 2019 सालाप्रमाणे याही वर्षी वाराणसी या जागेवरून निवडणूक लढवली. मोदी यांच्याविरोधात काँग्रेसने अजय राय यांना तिकीट दिले होते. नरेंद्र मोदी यांना आतापर्यंत 5 लाख 59 हजार 499 मते मिळाली आहेत. तर काँग्रेसचे उमेदवार राय यांना 4 लाख 15 हजार 140 मते पडली आहेत. म्हणजेच काँग्रेसचे अजय राय हे 1 लाख 44 हजार 359 मतांनी सध्यातरी पुढे आहेत. अजय राय मतांचा हा फरक पूर्ण करण्याची शक्यता नसल्याचे म्हटले जात आहे. म्हणजेच वाराणसी येथे मोदी यांचा विजय जवळपास निश्चित असल्याचे मानले जातेय.

दरम्यान, यंदाच्या लोकसभा निवडणुकीत धक्कादायक निकाल लागला आहे. एक्झिट पोलमध्ये यावेळीदेखील एनडीए बहुमतात सत्ता स्थापन करणार, असा अंदाज व्यक्त केला जात होता. पण आता प्रत्यक्ष मतमोजणी झाल्यानंतर देशात सध्यातरी वेगळे चित्र दिसत आहे. भाजपला महाराष्ट्रासह अनेक राज्यांत मोठा फटका बसला आहे. भाजपच्या अनेक दिग्गजांचा या निवडणुकीत फटका बसला आहे.