लोकसभा निवडणुकीत भाजपाचा दारूण पराभव झाला. हा पराभव स्वीकारून देवेंद्र फडणवीसांनी जबाबदारीतून मुक्त करण्याचीही विनंती केली होती. परंतु, फडणवीसांची ही विनंती फेटाळण्यात आली. दरम्यान, आता भाजपाचे राष्ट्रीय सचिव विनोद तावडे यांच्याकडून डावपेच रचले जात असल्याचा आरोप सुषमा अंधारे यांनी केला आहे. तसचं, देवेंद्र फडणवीसांची ताकद कमी करण्याचाही प्रयत्न केला जातोय, असं त्या म्हणाल्या.

सुषमा अंधारे म्हणाल्या, भाजपाला आणि एकूण केंद्रीय नेतृत्त्वाला देवेंद्र फडणवीसांची गॅरंटी वाटत नाही. देवेंद्र फडणवीसांचा चेहरा दाखवून आपण निवडणूक जिंकू शकू असं वाटत नाही. देवेंद्र फडणवीसांची वाढती नकारात्मक छबी भाजपाला डॅमेज करू शकते, असा त्याचा अर्थ आहे. त्यामुळे फडणवीसांना बाजूला करणे आणि केंद्रीय नेतृत्त्वाला आणून बसवणे हा सरळ सरळ प्रकार आहे. देवेंद्र फडणवीसांची शक्ती क्षीण करण्याचा प्रयत्न सुरू आहे.