उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांना राज्य सहकार परिषदेचा अध्यक्षपद करत त्यांना ताकद देण्याचा प्रयत्न केला. सहकार परिषदेच्या अध्यक्षपदाला राज्यमंत्रिपदाचा दर्जाही देण्यात आलाय. दरम्यान, यामुळे राजन पाटलांचे विरोधक आणि अजित पवारांचे समर्थक उमेश पाटील नाराज झाले आहेत. त्यांनी आता थेट मी राजीनामा लिहून ठेवला असल्याचे म्हटलं आहे. त्यामुळे शरद पवारांची साथ सोडल्यानंतर सोबत राहिलेले उमेश पाटील आता अजितदादांची साथ सोडणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
मोहोळ तालुक्यातील दोन पाटलांचा वाद चिघळलाय. माजी आमदार राजन पाटलांना राज्य सहकार परिषदेचा अध्यक्ष पद दिल्यानंतर राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटलांनी निर्वाणीचा इशारा दिलाय. लग्नापूर्वी पोरांनी लफडे केल्याचा आणि 302 कलम भोगण्याचा अभिमान असणाऱ्या माणसांवर पक्ष विश्वास ठेवतय याचं वाईट वाटतं. ज्यांनी आयुष्यभर सहकार संस्था बुडवल्या त्यांनाच आता सहकार परिषदेचे अध्यक्ष पद बहाल केले गेलाय, अशी खंत उमेश पाटलांनी व्यक्त केली आहे.
अजितदादांवर नेमकी काय जादू केलीय याची मलाही माहिती नाही,पण अजित दादांनी मला बैलगाडी खालचा कुत्रा म्हणून संबोधलं याचं वाईट वाटलं नाही. मात्र जरं पक्षाला माझा त्रास होतं असेल तर मी माझा राजीनामा तयार ठेवलाय. मी राजीनामा द्यायला गेलो होतो मात्र पक्षातील वरिष्ठ युवा नेत्याने मला थांबायला सांगितलंय. त्यामुळे मी हे राजीनामा पत्र परत घेऊन आलोय. मी आता मुख्य प्रवक्ता म्हणून भूमिका मांडणे थांबवलं आहे, जो पर्यंत याबतीत निर्णय होतं नाही तोपर्यंत मी अधिकृत प्रवक्ता म्हणून बोलणं योग्य होणार नाही, असंही उमेश पाटलांनी सांगितलं.
उमेश पाटील म्हणाले, मी राजीनामा घेऊन गेलो होतो मात्र माझा राजीनामा स्वीकारला गेला नाही. पक्षाने वेळ मागितला आहे, त्या गोष्टीला आता तीन दिवस झालेत. अजून 4 -5 दिवस वाट पाहून पुढचा निर्णय घेईन. अतिशय शांत डोक्याने विचार करून हा निर्णय मी घेतलंय. राजन पाटील जिथं असतात तोच आमदार निवडून येतो असं पक्षाला समज झाला असेल. पण आता काळ बदललंय, लोकांची भूमिका बदलली आहे. हे पक्षापर्यंत कसं पोहोचत नाहीये हे मलाही न समजणारे कोडे आहे. एका व्यक्तीला न्याय देण्यासाठी सर्वासामान्य लोकांवर अन्याय आहे.