मानखुर्द येथील लल्लूभाई कंपाऊंड मधील वादळी पावसामध्ये पडलेले झाड मनसेमुळे पुनर्जिवीत झाल्याची घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पडलेल्या झाडाकडे प्रशासनाने लक्ष दिले नसून लोकांनी मनसे विभाग अध्यक्ष जगदीश खांडेकर यांच्या कार्यालयात तक्रार केली. यानंतर, त्यांनी त्याठिकाणची पाहणी केली आणि प्रशासनाला इशारा दिला की त्वरित हे झाड पुनर्जिवीत नाही केले तर मनसे स्टाईलने आंदोलन केले जाईल. यानंतर प्रशासनाने झाड पुन्हा लावले आणि सर्व महाराष्ट्र सैनिकांनी पाणी घातले व प्रशासनाला आवाहन केले, की या झाडाला त्वरित कट्टा बांधून संरक्षण द्यावे तेव्हा प्रशासनाने सुद्धा लवकरात लवकर काम करून देतो असे कबूल केले.
मानखुर्द येथील लल्लूभाई कंपाऊंड मधील वादळी पावसामध्ये झाड पडले होते. जवळपास पंधरा दिवस उलटून गेले तरीही प्रशासनाने लक्ष घातले नाही. लोकांनी मनसे विभाग अध्यक्ष जगदीश खांडेकर यांच्या कार्यालयात तक्रार केली असता त्यांनी त्याठिकाणची पाहणी केली आणि प्रशासनाला इशारा दिला की त्वरित हे झाड पुनर्जिवीत नाही केले तर मनसे स्टाईलने आंदोलन केले जाईल. तेव्हा प्रशासनाने जागे होऊन झाड पुन्हा लावले आणि सर्व महाराष्ट्र सैनिकांनी पाणी घातले व प्रशासनाला आवाहन केले, कि या झाडाला त्वरित कट्टा बांधून संरक्षण द्यावे तेव्हा प्रशासनाने सुद्धा लवकरात लवकर काम करून देतो असे कबूल केले असून स्थानिक नागरिकांनी मनसेचे आभार मानले कारण गोवंडी मानखुर्द छ शिवाजीनगर हा भाग प्रचंड प्रदूषित असून झाडे मोठ्या प्रमाणावर लावणे गरजेचे असताना प्रशासन लक्ष घालत नाही ही शोकांतिका आहे व लवकरच प्रदूषण विषयावर आंदोलन छेडणार आहे असे मनसे विभाग अध्यक्ष जगदीश खांडेकर यांनी सांगितले.