येणारी विधानसभा निवडणूक मनसे ताकतीने लढवणार आहे त्यासाठी सांगली विधानसभा क्षेत्रामध्ये पक्षाने जोरदार बांधणी चालू केली आहे. या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सूचनेनुसार सांगली महापालिका क्षेत्रातील पक्षाची पुनर्बांधणी काल करण्यात आली. या पुनर्बांधणीमध्ये जुनी पद रचना रद्द करून नव्याने पद रचनेनुसार पदाधिकार्‍यांच्या निवडी केल्या आहेत. यामध्ये जिल्हा उपाध्यक्ष पद रद्द करून विधानसभा क्षेत्रासाठी विभाग अध्यक्ष म्हणून श्रीधर करडे यांचे नियुक्ती करण्यात आली सांगली व कुपवाड शहरासाठी सुरेश टेंगले यांचे शहराध्यक्षपदी निवड करण्यात आली. तसेच शहर उपाध्यक्ष म्हणून रोहित घुबडे पाटील तर शहर सचिव हरी पाटणकर, महेश मोरे, विजय मौर्य, यांची निवड करण्यात आली.

याचप्रमाणे, सांगली कुपवाड महानगरपालिका क्षेत्रातील १३ प्रभागमध्ये प्रभाग अध्यक्ष निवडले आहेत. त्यामध्ये स्वप्नील शिंदे, अमित पाटील, संजय खोत, सागर कोळेकर, सुजित पवार, संग्राम पाटणकर, सुनील मासाळ, प्रशांत कांबळे या सह अन्य प्रभाग अध्यक्ष म्हणून नेमणूका करण्यात आल्या आहे. त्याचबरोबर उपविभाग अध्यक्ष शाखाध्यक्ष, उपशाखा अध्यक्षासह २०० गटाध्यक्ष असे एकूण ३०१ पदाधिकारी सांगली विधानसभा क्षेत्रामध्ये नियुक्त करण्यात आले आहेत.

सांगली विधानसभेला ताकतीने सामोरे जाण्यासाठी आज जम्मू कार्यकारणी राज ठाकरे यांच्या आदेशानुसार व जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड करण्यात आली. यामुळे सांगली विधानसभा क्षेत्रामध्ये पक्षाची मोठी ताकद उभी राहिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *