काहीच दिवसात राज्यात विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. अनेक चर्चा यापार्श्वभूमीवर रंगत आहेत. यापैकी सध्या एक चर्चा होती वरळी मतदार संघ आणि आदित्य ठाकरेंची ! आदित्य ठाकरे यावेळी वरळीमधून उभे राहणार का ? हा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चिला जात होता. अखेर आज युवासेना प्रमुख , आमदार आदित्य ठाकरेंनी वरळी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे , रश्मी ठाकरे यांच्या उपस्थितीत व तमाम वरळीकरांच्या आशीर्वादाने महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार म्हणून १८२- वरळी विधानसभा मतदारसंघातून युवासेना प्रमुख , आमदार आदित्य ठाकरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.

यावेळी, यावेळी शिवसेना नेते सुभाष देसाई, खासदार अरविंद सावंत, खासदार अनिल देसाई, प्रियंका चतुर्वेदी, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आमदार सुनील शिंदे, आमदार सचिन अहिर, अजय चौधरी जी, शिवसेना सचिव आदेश बांदेकर, शिवसेना सचिव दुर्गे साईनाथ, विभागप्रमुख आशिष चेंबूरकर , माजी महापौर किशोरी पेडणेकर, माजी उपमहापौर शुभांगी वरळीकर, तेजस ठाकरे आदी यावेळी उपस्थित होते.

यासाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. उमेदवारीच्या याद्या पक्ष जाहीर करत आहेत. त्यामुळे कोणासमोर कोणाचे आव्हान असणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. अनेक चर्चा यापार्श्वभूमीवर रंगत आहेत. यापैकी सध्या एक चर्चा होती वरळी मतदार संघ आणि आदित्य ठाकरेंची ! आदित्य ठाकरे यावेळी वरळीमधून उभे राहणार का ? हा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चिला जात होता. अखेर आज आदित्य ठाकरेंनी वरळी विधानसभा मतदारसंघातून युवासेना प्रमुख होळीचे कार्यसम्राट दमदार आमदार श्री. आदित्य साहेब ठाकरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *