विधानसभेची निवडणूक जाहीर झाल्यापासूनच यंदा राज्यात मोठी चुरस पाहायला मिळणार हे स्पष्ट झालं आहे. अशातच, सध्या माहीम मतदारसंघ चर्चेत आहे.
माहीममधून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे सुपुत्र अमित ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. तर, त्यांच्या विरोधात महायुतीकडून सदा सरवणकर आणि ठाकरेंकडून महेश सावंत निवडणुकीच्या रिंगणात आहेत. अशातच, महायुतीच्या काही नेत्यांनी माहीममध्ये अमित ठाकरेंना पाठींबा जाहीर केला आहे.
अमित ठाकरेंच्या विरोधात महायुतीने उमेदवार न देता, अमित ठाकरेला पाठींबा देण्याची मागणी भाजप नेते आशिष शेलार यांनी केली मात्र, सदा सरवणकर आपल्या निर्णयावर ठाम असून ते आज फॉर्म भरणार असल्यानं तिहेरी लढत अटळ असल्याचं बोललं जात आहे. अशातच, समाधान सरवणकरांच्या स्टेटसनंतर आता माहीममध्ये आता तिहेरी लढत अटळ असल्याचं बोललं जात आहे. आज शिवसेना आमदार सदा सरवणकर शिवसेना शिंदेगटाकडून विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करणार आहेत. सदा सरवणकरांचे पुत्र समाधान सरवणकर यांनी व्हॉट्सअॅपवर स्टेटस ठेवलं असून उद्या म्हणजे, 29 ऑक्टोबर रोजी निवडणूक अर्ज भरणार असल्याची माहिती दिली आहे. समाधान सरवणकरांनी स्टेटसमध्ये लिहिलं आहे की, “आमदार सदा सरवणकर यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी दिनांक 29 ऑक्टोबर रोजी सकाळी 9 वाजता सर्वांनी शाखा क्रमांक 194, सामना प्रेस प्रभादेवी इथे उपस्तिथ राहावं…”