kshitij Magazine & News

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

मोठी बातमी ! सुनेत्रा पवारांचा उद्धव ठाकरेंना फोन.. काय झाली चर्चा?

राज्याच्या राजकारणात वेगवान घडामोड घडत आहे. बारामती आणि राहुरी विधानसभेची पोटनिवडणूक आता टप्प्यात आली आहे. काँग्रेस पक्षाने या दोन्ही मतदारसंघात उमेदवार उभे करण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची आशा मावळली आहे. महाविकास आघाडीत काँग्रेस हा प्रमुख पक्ष आहे. तर उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसकडून अद्याप काँग्रेसच्या भूमिकेवर प्रतिक्रिया आलेली नाही. महाविकास आघाडी काँग्रेससोबत असणार की नाही हे समोर आलेले नाही. त्याचवेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी उद्धव ठाकरे यांना फोन केला आहे.

दिवंगत अजितदादा यांच्या अपघाती निधनानंतर बारामती विधानसभा पोटनिवडणूक होत आहे. सुनेत्रा पवार यांनी अगोदर राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा दिला आहे. हा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. आता आमदारकीसाठी त्या बारामतीची पोटनिवडणूक लढवतील. दरम्यान उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी उद्धव ठाकरे यांना फोन केला आहे. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत पाठिंबा देण्याची मागणी त्यांनी केली आहे. काँग्रेस पक्ष बारामती पोटनिवडणुकीत उतरल्याने ही निवडणूक बिनविरोध होणार नाही हे स्पष्ट झाले आहे. त्यातच सुनेत्रा पवार यांनी उद्धव ठाकरे यांना फोन करून शिवसेनेचा पाठिंबा मागितला आहे. तर त्यांनी ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठीही उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे काँग्रेससोबत याविषयावर चर्चा करतील का याची उत्सुकता ताणली गेली आहे. महाविकास आघाडीतील इतर घटक पक्षांनी अजून काँग्रेसच्या भूमिकेवर प्रतिक्रिया दिलेली नाही.

बारामती आणि राहुरी मतदारसंघाची पोटनिवडणूक लढवण्यासाठी दिल्लीहून हिरवा कंदिल मिळाल्याची माहिती आहे. बारामती पोटनिवडणुकीसाठी 6 इच्छुकांनी काँग्रेसकडून उमेदवारी मागितली आहे. तर राहुरी मतदारसंघासाठी 4 उमेदवारांनी पक्षाकडे तिकीट मागितले आहे. या सर्वांच्या ऑनलाईन मुलाखती झाल्यात. आता काँग्रेस मित्रपक्ष उद्धव सेना आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीसोबत चर्चा करेल आणि निर्णय घेणार आहे. राष्ट्रवादी जर निवडणूक लढणार नसेल तर काँग्रेस ही निवडणूक लढण्यास तयार आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी अगोदरच स्पष्ट केले आहे. काँग्रेसला राष्ट्रीय समाज पक्ष, वंचित बहुजन आघाडीसह इतरांनी या पोटनिवडणुकीसाठी पाठिंबा दिल्याने लढत चुरशीची होण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *