Breaking News

माझं रक्ताचं नातं महाराष्ट्राशी आहे. महाराष्ट्र माझं कुटुंब आहे – उद्धव ठाकरे

उद्धव ठाकरे यांना एका मुलाखतीत विचारण्यात आले की, तुम्ही अमित ठाकरे यांना पाठिंबा देणार का ? तेव्हा उद्धव ठाकरे म्हणाले की, जे ‘महाराष्ट्राचे लुटारू आहेत त्यांना मी स्वप्नातही पाठिंबा देणार नाही. विषय संपला. माझं रक्ताचं नातं महाराष्ट्राशी आहे. महाराष्ट्र माझं कुटुंब आहे. कोरोनात मी जबाबदारी घेतली ना. ते कुटुंब लुटलं जातं. त्या लुटारूंना अप्रत्यक्षपणे स्वप्नात पाठिंबा देणार नाही. माझं मत आहे. महाराष्ट्र प्रेमींनी महाराष्ट्र लुटारूंना पाठिंबा देऊ नये. महायुती महाराष्ट्र लुटतात. त्यांना पाठिंबा देणारे यांनाही पाठिंबा नाही.’

उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘माझ्या कुटुंबाची जबाबदारी घेतली तर खिल्ली उडवली होती. आता त्याची जबाबदारी घेतली तर पोटात का दुखतं. माझी तेव्हा खिल्ली उडवली. माझ्या आजाराची नक्कल केली. त्यांना मी मदत करणार नाही.’ अशी भूमिका उद्धव ठाकरे यांनी मांडली. महाराष्ट्राच्या लुटारूंना प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष… जसं ते हे करतात ना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे दाखवणार नाही , हे करणार नाही… अशी शपथ घेताना बोलतात तसं महाराष्ट्राच्या लुटारूंना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष मदत करणार नाही अथवा मदत करणाऱ्यांना देखील मदत करणार नाही. हे छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन बोलतोय. महाराष्ट्र माझं कुटुंब आहे. असं ही उद्धव ठाकरे म्हणाले.

तुम्ही ग्रामीण भागात जाऊन पाहा. मुलांच्या शिक्षणाची वाट लागलीय. वडील आत्महत्या करत आहे. अशा कुटुंबाकडे कोण पाहणार. हे सरकार आलं तर असे चालूच राहील. अशी टीका ही उद्धव ठाकरे यांनी केली. जे दिसतंय ते होईल. महाराष्ट्र पिसाळलेला आहे. महाराष्ट्र पाठीवर वार करत नाही. महाराष्ट्राला लागलेला कलंक पुसायचा आहे. यांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्यातही पैसा खाल्ला. कर्नाटकाचं सरकार ४० टक्के वाले होतं. हे सरकार लोक म्हणतात ६० टक्केवाले आहे.

पक्ष फोडणं हा यांचा चोर बाजार, हा भाकड जनता पक्ष आहे. यांना नेते निर्माण करता आले नाही. आदर्श निर्माण करता आले नाही. मोदींना बाळसााहेबांच्या नावाने मतांचा जोगवा मागावा लागला. ते बाळासाहेबांच्या विरोधात बोलण्याची त्यांची हिंमत नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *