Breaking News

ते पुन्हा आले… ! राज्यामध्ये देवेंद्र पर्वाला सुरुवात ; अजितदादांनी सहाव्यांदा तर शिंदेंनी पहिल्यांदा उपमुख्यमंत्री म्हणून घेतली शपथ

मी पुन्हा येईन… म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनी आज अखेर तिसऱ्यांदा महाराष्ट्रा राज्याचे 21 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्याचसोबत एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनीही उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. देवेंद्र फडणवीसांना शपथविधाीला घरातून निघण्यापूर्वी त्यांच्या आईने औक्षण केलं. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याआधी गोमातेचं पूजन केलं. ज्याची पोस्ट त्यांनी सोशल मीडियावर शेअर केली आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यामुळे आता महाराष्ट्रात पुन्हा एकदा देवेंद्र पर्वाला सुरुवात झाली आहे. देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधीचा सोहळा हा अतिशय भव्यदिव्य असा ठरला. एकनाथ शिंदे यांनी नव्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत इतर केंद्रीय मंत्री उपस्थित आहेत. तब्बल 22 राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी या सोहळ्याला हजेरी लावली. अजित पवार यांनी राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यामुळे त्यांच्या नावे एका विक्रमाची नोंद झाली आहे. अजित पवारांनी आतापर्यंत तब्बल सहा वेळा उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. या शपथविधी सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत इतर केंद्रीय मंत्री उपस्थित आहेत. तब्बल 22 राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी या सोहळ्याला हजेरी लावली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *