या वीकएंडला, इंडियन आयडॉल 15 या सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील लोकांच्या आवडत्या कार्यक्रमात विशाल मिश्रा या प्रसिद्ध गायकाला समर्पित एपिसोड सादर होणार आहे. विशाल मिश्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी परीक्षक श्रेया घोषाल, विशाल ददलानी आणि बादशाह सर्व स्पर्धकांसह एकत्र येतील. या वेळी, कोलकाताहून आलेला ‘आयडॉल की फीलवाला परफॉर्मर’ प्रियांशु दत्ता ‘कैसे हुआ’ गाण्यावर एक दमदार परफॉर्मन्स देईल, जो ऐकताना परीक्षक भारावलेले दिसतील. श्रेया घोषाल, बादशाह आणि मान्यवर अतिथी विशाल मिश्रा प्रियांशुला स्टँडिंग ओव्हेशन देऊन गौरवतील.
विशाल मिश्राचा फॅन असलेल्या प्रियांशुच्या परफॉर्मन्समधून त्याला विशाल मिश्राविषयी वाटणारे कौतुक दिसून येत होते. परीक्षक बादशाहने विशाल मिश्राबद्दल प्रियांशुच्या निष्ठेचे कौतुक करताना म्हटले, “विशालच्या उपस्थितीतला हा तुझा परफॉर्मन्स अप्रतिम होता. माझे तर डोळे पाणावले. चित्र जणू परिपूर्ण झाले. तू याच क्षणाची वाट बघत होतास ना?”
प्रियांशुचे गाणे ऐकून विशाल मिश्रा मंचावर गेला आणि त्याला आलिंगन देत म्हणाला, “जर त्यांना तू आधी भेटला असतात, तर हे गाणे त्यांनी तुलाच दिले असते.” इंडियन आयडॉलमधल्या आपल्या प्रवासाविषयी बोलताना तो म्हणाला, “तू खूप खास आहेस. जेव्हा गाणे मनापासून येते तेव्हा ते हमखास हृदयाला स्पर्श करते. तुला पाहून मला पूर्वीचा मी आठवत आहे. इंडियन आयडॉल एक अनोखा मंच आहे. आनंद सर आणि मी अनेक वर्षांपासून एकमेकांना ओळखत आहोत. अशा प्रतिष्ठित मंचावर गाण्यासाठी हिंमत लागते, आत्मविश्वास लागतो आणि देवाचा आशीर्वाद मिळावा लागतो. जर तुला कधीही काही मदत हवी असेल, तर संकोच करू नकोस. मला तुझा मोठा भाऊच समज.”
सुरुवातीच्या काळातील मुंबईची एक आठवण शेअर करताना विशाल म्हणाला, “मी जेव्हा 2012 मध्ये मुंबईत आलो, तेव्हा लोखंडवालामध्ये एक दुकान होते. या दुकानात एक पुस्तक होते, ज्यामध्ये वेगवेगळ्या दिग्दर्शकांची आणि संगीत निर्मात्यांची नावे आणि त्यांचे पत्ते होते. मी दररोज तिकडे जायचो आणि पुस्तकातून नंबर शोधायचो. एक दिवस, दुकानदाराने मला पकडले आणि त्यानंतर ते नंबर मिळवण्यासाठी मला प्रत्येक वेळी 50 रु. द्यावे लागायचे. आपल्या स्वप्नांचा पाठलाग करणे किती कष्टप्रद असते, हे मला माहीत आहे. ‘कैसे हुआ’ गाण्याने माझे आयुष्य बदलून टाकले आणि मी आशा करतो की हा मंच तुझे आयुष्य पालटून टाकेल.”
त्यानंतर इंडियन आयडॉलचा होस्ट आदित्य नारायण याने विशाल मिश्रासाठी एक सर्प्राइज आणले. एक व्हिडिओ लावण्यात आला, ज्यात इंडियन आयडॉल मधल्या ऑडिशनपासून आजच्या यशापर्यंतचा विशालचा प्रवास चित्रित करण्यात आला होता. त्यावेळी तो थिएटर राऊंडमध्ये बाहेर निघाला होता. हा व्हिडिओ पाहून विशाल आणि इतरही सर्व जण भावुक झाले. तो म्हणाला, “मी उन्नावचा आहे. आम्ही जेव्हा ऑडिशनसाठी प्रवास करून यायचो, तेव्हा आम्हाला इंडियन आयडॉल बद्दल फार आकर्षक होते, पण घरच्यांचा फारसा सपोर्ट नव्हता. मी काही तरी वेगळे करावे असे माझ्या आई-वडीलांना वाटत होते. छोट्या शहरांमध्ये तर स्वप्न बघायला देखील परवानगी घ्यावी लागते. माझे तर स्वप्न मोठे होते. या मंचाने माझ्यासाठी एक वर्तुळ पूर्ण केले आहे.”
या भावनिक गोष्टी ऐकून सगळेजण भावनावश झाल्याचे बादशाहने पाहिले, त्यामुळे जरा विनोद करून त्याने वातावरण हलके-फुलके करण्याचा प्रयत्न केला.
बघायला विसरू नका, इंडियन आयडॉल 15 या वीकएंडला रात्री 9 वाजता फक्त सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर!