kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

सेलिब्रिटी मास्टरशेफमध्ये हिना खान आणि रॉकीच्या लग्नाच्या केटरिंगसाठी एक चविष्ट लढाई

सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनवरील सेलिब्रिटी मास्टरशेफमध्ये हिना खान आणि रॉकी जयस्वाल
किचनमध्ये आल्याने एक आनंददायी वळण मिळण्यासाठी येथील स्टेज सज्ज झाले आहे. ही
जोडी त्यांच्या लग्नासाठी एक परिपूर्ण केटरिंग सेवा निवडण्याच्या विशेष मिशनसाठी या मालिकेत
सहभागी झाले आहे. जज रणवीर ब्रार म्हणतात, “मेनू तयार करण्याची ही खूप मोठी संधी आहे.”
मात्र अर्थातच लग्नाप्रमाणे लडकीवाले आणि लडकेवाले यांच्यात मजेदार स्पर्धा रंगणार आहे.
कारण ते त्यांच्या पाककलेच्या कौशल्याने जोडप्याला प्रभावित करण्यासाठी स्पर्धा लावतील.
 टीम लडकीवाले यांच्यात फैसल शेख, तेजस्वी प्रकाश, अर्चना गौतम, गौरव खन्ना यांचा
समावेश असून ते सर्वोत्कृष्ट परफॉर्मन्ससाठी तयार आहेत. तर राजीव अदतिया, उषा नाडकर्णी,
निक्की तांबोळी आणि दीपिका कक्कर यांचा समावेश असलेली लडकेवाली टीम स्वयंपाकघरात
मसालेदार पदार्थ करण्यासाठी सज्ज आहे. प्रेम, हास्य आणि भरपूर मसालेदार पदार्थांनी युक्त
अशा एका रुचकर मनोरंजक एपिसोडसाठी तयार व्हा- कोण जिंकणार, लडकीवाले की लडकेवाले?
हा प्रश्न गंभीर आहे.
या चॅलेंजदरम्यान हिना आणि रॉकीने त्यांच्या हृदयस्पर्शी प्रेमकथेबद्दल सांगितले. हिना
म्हणाली, “खूप वर्षांपूर्वी माझ्या पहिल्या शोच्या सेटवर मी त्याला भेटले होते. तो दुसऱ्या
कुणाच्या जागी सुपरवायझिंग प्रोड्युसर म्हणून आला होता. मी त्याला भेटलेही नव्हते, पण मला
ते आवडलं नव्हतं. मी खूप पूर्वग्रहदूषित होते. पण तो खूप चार्मिंग आहे, त्याच्या कामाच्या
पद्धतीने मी प्रभावित झाले. कामातूनच आमचं नातं वाढत गेलं. खूप काळ आम्ही चांगले मितर्
होतो.” रॉकी हसत म्हणाला, “मला वाटतं आमच्यात प्रेमाआधी आदर आला. हीना ही खूप
समर्पित आणि प्रतिभावान आहे. पण मला तिचे गुण आवडले. आम्ही दररोज एकमेकांना
भेटायचो, अनेक दिवस मित्र होतो. पण एके दिवशी आम्ही एकमेकांना मिठी मारून भेटलो, तेव्हा
हे काहीतरी वेगळं असल्याची जाणीव झाली. ” हिना पुढे म्हणाली, “तेव्हा आम्हाला समजलं की
ती आता मैत्री राहिली नाही.” परस्परांबद्दल आदर आणि गहिऱ्या नातेसंबंधातून अनपेक्षितपणे

प्रेम कसे फुलू शकते, हे यांच्या कथेवरून कळते. हीना खान आणि रॉकी जयस्वाल यांना परफेक्ट
केटरिंग सेवा मिळेल का? सेलिब्रिटी शेफ या आव्हानाला सामोरे जातील का?

नाट्यमय घडामोडी, अनपेक्षित वळणे आणि सेलिब्रिटी शेफच्या विजेतेपदासाठीची लढाई पहायला
विसरू नका! सोमवार ते शुक्रवार रात्री 8 वाजता, फक्त सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजन आणि

सोनी टेलिव्हिजन वर…..