सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजन वरील सर्वात लोकप्रिय क्राइम शो पैकी एक क्राइम पेट्रोल पुन्हा सुरु होणार आहे. या नव्या सीझनमध्ये 26 अत्यंत गुंतागुंतीच्या आणि चित्तथरारक हत्या प्रकरण प्रेक्षकांना खिळवून ठेवतील. ज्यांचे प्रभावी सूत्रसंचलन या कार्यक्रमाशी एकरुप झाले आहे, ते या कार्यक्रमाचे निवेदक म्हणून पुन्हा पपरतले आहेत. ते त्यांच्या विशेष शैलीद्वारे प्रेक्षकांना गंभीर प्रकरणाबद्दल माहिती देतील, ज्यामुळे विश्वासार्हता व गांभीर्य दिसून येईल.

प्रत्येक प्रकरण जसजसे हळू हळू पुढे जाईल, तसतसा क्राइम पेट्रोलचा नवीन सिझन प्रत्येक वळणावर एक प्रश्न विचारतो- ‘आखीर खून किसने किया?’ वास्तविक जीवनातील घटनांवर आधारीत या घटना अत्यंत गुंतागुंतीच्या तपासात प्रेक्षकांना खोलवर घेऊन जातात. यातून भयंकर गुन्ह्यांचे धक्कादायक सत्य आणि त्यामागील गुन्हेदारांचा पर्दाफाश होईल.

कार्यक्रमात पुन्हा येण्याबद्दल अनुप सोनी यांनी उत्सुकता व्यक्त केली. ते म्हणाले, “क्राइम पेट्रोल ही मालिका त्याच्या आकर्षक कथनामुळे प्रेक्षकांचा आवडता कार्यक्रम बनला आहे. कार्यक्रमातील खूनांचे रहस्य अधिक गूढ आहे, त्यामुळे नवीन सीझन प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याचे वचन देतो, खऱ्या आयुष्यातील घटनांवर आधारीत असा यातील प्रत्येक भाग अत्यंत गुंतागुंतीच्या हत्या प्रकरणांची उकल करून खऱ्या गुन्हेगाराचा पर्दाफाश करतो. या गुंतागुंतीच्या तपासांत प्रेक्षकांना घेऊन जाणारा सूत्रसंचालक म्हणून मी परत आलो आहे, याचा माला खूप आनंद झाला आहे. नव्या प्रोमोने आधीच प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे आणि प्रेक्षकांना हा कार्यक्रम आवडेल, अशी मला खात्री आहे. ”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *