kshitij Magazine & News

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

JN.1 ची लक्षणं आणि भारताची सज्जता पण कोव्हिडचा ‘JN.1’ व्हेरियंट किती गंभीर आहे? महाराष्ट्रात आतापर्यंत रुग्णांची संख्या किती आहे?

सिंगापूर, हाँगकाँगसारख्या अनेक देशांमध्ये कोव्हिड-19 च्या रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढलेली आहे. भारतामधली परिस्थिती नियंत्रणात असल्याचं सांगण्यात आलंय. 27 एप्रिल ते 3 सिंगापूर 2025 च्या आठवड्यामध्ये सिंगापूरमध्ये कोव्हिडचे 14 हजार 200 नवे रुग्ण आढळल्याचं सिंगापूरच्या आरोग्य मंत्रालयाने सांगितलंय, तर त्या आधीच्या आठवड्यामध्ये कोव्हिडचे 11 हजार 100 रुग्ण आढळले होते. तर थायलंड, हाँगकाँगसोबतच चीनमध्येही गेल्या काही महिन्यांमध्ये कोव्हिड-19 चे रुग्ण वाढले आहेत.

ओमिक्रॉन व्हेरियंटचा उपप्रकार असणाऱ्या JN.1 मुळे ही रुग्णसंख्या वाढल्याचं तज्ज्ञांनी म्हटलंय. भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या डॅशबोर्डनुसार, भारतात सध्या (20 मे 2025) कोव्हिडचे 257 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यापैकी 53 मुंबईत आहेत.

JN.1 काय आहे?

सिंगापूरमध्ये आतापर्यंत ज्या सँपल्सचं जीनोम सिक्वेन्सिंग करण्यात आलं, त्यात बहुतेक प्रकरणं JN.1 व्हेरियंटची आढळल्याचं इकॉनॉमिक टाईम्सने म्हटलंय.

पण हा JN.1 व्हेरियंट नवा नाही.

गेल्या काही काळापासून जगभरात आढळणाऱ्या ओमिक्रॉनचा हा सब-व्हेरियंट म्हणजे उप-प्रकार आहे.

दिल्लीच्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था म्हणजे एम्स (AIIMS) चे कम्युनिटी मेडिसिन विभागाचे प्राध्यापक डॉक्टर संजय राय हे कोव्हॅक्सिन या कोव्हिड लशीच्या तीनही टप्प्यांमध्ये प्रमुख संशोधक होते.

सिंगापूरच्या आरोग्य मंत्रालयानुसार, “सध्याच्या घडीला LF.7 आणि NB1.8 (JN.1 चा सब व्हेरियंट) हे सिंगापूरमध्ये पसरत असलेल्या कोव्हिड-19 साठी प्रामुख्याने जबाबदार आहेत. आतापर्यंत ज्या प्रकरणांमध्ये जीनोम सिक्वेन्सिंग करण्यात आलं त्यापैकी दोन तृतीयांश रुग्ण याचेच आहेत. JN.1 हा तो व्हेरियंटही आहे ज्याचा वापर सध्याच्या कोव्हिड-19 लशी तयार करण्यासाठी केला गेलाय.”

हा व्हेरियंट पूर्वीच्या कोरोना व्हेरियंट्सप्रमाणे लोकांना गंभीर आजारी पाडत नसला तरी तो ज्या वेगाने पसरतोय, ते चिंताजनक असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

JN.1 ची लक्षणं आणि भारताची सज्जता

कोरोना व्हायरसच्या या व्हेरियंटची लागण झाल्यास आढळणारी लक्षणं ही ओमिक्रॉनपेक्षा फारशी वेगळी नाहीत.

JN.1चा संसर्ग झालेल्या रुग्णांमध्ये घसा खवखवणं, थकवा, डोकेदुखी आणि कफसारखी लक्षणं आढळतात.

पण अनेकांबाबत या गोष्टी त्यांचं एकूणच आरोग्य आणि रोगप्रतिकारक शक्तीवरही अवलंबून असतील.

JN.1 च्या काही रुग्णांमध्ये डायरिया आणि डोकेदुखीही आढळते.