राज्याच्या राजकारणातील सर्वात मोठी आणि दुःखद बातमी समोर येत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला बारामती विमानतळावर उतरताना भीषण अपघात झाला असून, या दुर्घटनेत अजित पवारांसह विमानातील सर्व ६ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे.
डीजीसीएने या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या आज बारामतीमध्ये सभा होणार होत्या. त्या सभांसाठी अजित पवार हे आज सकाळी मुंबईहून बारामती येथे निघाले होते. दरम्यान, त्यांचं विमान बारामती विमानतळावर उतरत असताना विमानाला अपघात होऊन ते जवळच्या शेतात कोसळलं.
अशी होती कारकीर्द !!
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा २२ जुळे १९५९ रोजी जन्म झाला
१९८२ साली त्यांनी स्थानिक राजकारणात प्रवेश केला.
अजितदादा पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक असे नाव होते ज्यांनी अनेक दशकं सत्ता आणि संघटना दोन्हीवर मजबूत पकड राखली.
महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्रात लवकरच स्वतःचे स्थान निर्माण केले.
त्यांचे काका शरद पवार यांच्यासोबत त्यांनी काँग्रेस पक्ष आणि नंतर फुटलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मजबूत करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
१९९३ साली शरद पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले तेव्हा अजित पवार यांनाही मंत्रिमंडळात स्थान मिळाले. त्यानंतरही ते सरकार आणि संघटनेत महत्त्वाच्या भूमिका बजावत राहिले.
२०१० मध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस युती सरकारमध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून नियुक्ती झाल्यानंतर अजित पवार यांचा राजकीय लौकिक आणखी वाढला. या काळात ते राज्याच्या राजकारणातील सर्वात प्रभावशाली नेत्यांपैकी एक बनले. राजकारणाव्यतिरिक्त, अजित पवार यांचा सहकार क्षेत्रातही मोठा प्रभाव होता.
ते महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखान्यांशी संबंधित होते आणि पुणे जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले. ते महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखान्यांशी संबंधित होते आणि पुणे जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे.
अजित पवार यांनी जुलै २०२३ पासून पुन्हा एकदा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून काम पाहिले. या भूमिकेत त्यांनी पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात आपले निर्णायक अस्तित्व प्रस्थापित केले. गेल्या चार दशकांहून अधिक काळ राजकीय अनुभव असलेले अजित पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणाचे एक कुशल रणनीतीकार आणि मजबूत प्रशासक मानले जात होते.












