kshitij Magazine & News

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

मुंबई पावसात बुडाली – महापालिकेचा भोंगळ कारभार उघड ; राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष – मुंबई अध्यक्ष ॲड. अमोल मातेले यांची तीव्र प्रतिक्रिया

मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच सुरू झालेल्या पावसाने मुंबईकरांचे जनजीवन विस्कळीत केले आहे. रस्ते जलमय, वाहतूक ठप्प, आणि नागरिकांचे हाल सुरू आहेत. याला एकमेव जबाबदार – बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) नालेसफाई आणि रस्त्यांचे अपूर्ण कामे महानगरपालिकेने नेहमीप्रमाणेच नालेसफाई अपुरी ठेवली. एकाच वेळी अनेक ठिकाणी रस्ते खोदून ठेवले गेले, पण एकही रस्ता पूर्ण दुरुस्त केला नाही. यामुळे पावसात पाणी साचून वाहतूक ठप्प झाली आणि नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागला.

झाडे पडून अपघात नागरिकांचा मृत्यू विक्रोळीतील गणेश मैदानात 26 वर्षीय तेजस नाईडू यांचा झाड पडून मृत्यू झाला. तो त्याच दिवशी नवीन नोकरीला जॉईन होणार होता. त्याच्या कुटुंबीयांनी BMCच्या हलगर्जीपणावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

पाणी उपसासाठीचे पंप बंद जलभरावाची स्थिती महानगरपालिकेने पावसाळ्यापूर्वी 482 पंप बसवण्याचे नियोजन केले होते, पण त्यातील अनेक पंप वेळेवर कार्यान्वित झाले नाहीत. यामुळे दादर, सायन, मसीद बंदर, चुनाभट्टी या ठिकाणी गंभीर जलभराव झाला.

महानगरपालिकेचा भोंगळ कारभार महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी वेळेवर उपाययोजना केल्या नाहीत. झाडांची छाटणी, नालेसफाई, रस्त्यांचे दुरुस्ती कामे यामध्ये हलगर्जीपणा दिसून आला. यामुळे नागरिकांचे हाल झाले आणि अपघात घडले. कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी अपयशी कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकावे. कर्तव्य कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर निलंबन व कारवाई करावी. महानगरपालिकेच्या कामांची स्वतंत्र यंत्रणेकडून तपासणी करावी.

मुंबईकरांनी दरवर्षी त्रास सहन करायचा आणि पालिकेच्या अधिकाऱ्यांनी व कंत्राटदारांनी सवलती घ्यायच्या, हे आता थांबायलाच हवं. महानगरपालिकेने जबाबदारी स्वीकारून तात्काळ उपाययोजना कराव्यात.