kshitij Magazine & News

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

नीट परीक्षा पुढे ढकलली, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर एनबीईएमएसचा मोठा निर्णय

नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन इन मेडिकल सायन्सने येत्या १५ जून २०२५ रोजी होणारी नीट पीजी २०२५ परीक्षा पुढे ढकलली. नीटची परीक्षा ही दोन शिफ्टमध्ये न घेता एकाच शिफ्टमध्ये घ्या, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने एनबीईएमएस दिले होते. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. परीक्षेची पुढील तारीख लवकरच जाहीर केली जाईल. एनबीईएमएसचे अधिकृत अधिकृत पोर्टल वगळता इतर कोणत्याही माध्यमातून मिळालेल्या माहितीवर विश्वास ठेवू नका, असेही विद्यार्थ्यांना आवाहन करण्यात आले.

नीट परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने नीट पीजी परीक्षा एकाच शिफ्टमध्ये घेण्याचे आदेश दिले. यानंतर ही परीक्षा एकाच शिफ्टमध्ये होणार असल्याचे एनबीईएमएसकडून स्पष्ट करण्यात आले. त्यामुळेच येत्या १५ जून रोजी होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. सुधारित वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाईल, अधिकृत पोर्टल वगळता इतर कोणत्याही माध्यमातून मिळालेल्या माहितीवर विश्वास ठेवू नका, असेही एनबीईएमएसने सांगितले.

पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी नीट पीजी परीक्षा आयोजित केली जाते. ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर उमेदवाराला खालील पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी पर्याय मिळतात, यात मास्टर ऑफ सर्जरी, डॉक्टर ऑफ मेडिसिन आणि पीजी डिप्लोमा कोर्सचा समावेश आहे.