अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातील निवडणुकीच्या मतमोजणी पूर्ण झाली आहे. या निवडणुकीत पुन्हा एकदा मेघराज राजेभोसले यांच्या नेतृत्वाखालील समर्थ पॅनेलने दणदणीत विजय मिळवला आहे. समर्थ पॅनलमधील सर्व उमेदवार विजयी झाले आहेत. ही निवडणूक 17 जागेसाठी लढण्यात आली होती. ज्यामध्ये बिनविरोध 3 जागा झाल्या होत्या. त्यामुळे 14 जागेसाठी ही निवडणूक घेण्यात आली होती.

मेघराज राजेभोसले यांच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या समर्थ पॅनेलमध्ये 16 उमेदवार होते. ज्यामध्ये सुनील महाजन, दीपक कदम, अजित शिरोळे, राज काजी, सुशांत शेलार, धनाजी यमकर, सुभाष नकाशे, शरद चव्हाण, प्रवीण पाटील, चैत्राली डोंगरे, रवी गावडे, गणेश गारगोटे आणि विकास तोरणे यांनी निवडणुकीसाठी अर्ज भरला होता. हे सर्व 14 उमेदवार समर्थ पॅनेलमधून विजयी झाले आहेत.















Leave a Reply