kshitij Magazine & News

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

उबाठा गटाचे माजी आमदार महादेव बाबर यांनी हाती बांधले घड्याळ ;अजितदादा पवारांनी केले स्वागत.

संघटना वाढवणारे लोकं पक्षात आले आहेत त्यामुळे मिळूनमिसळून काम करुया. सर्वांना मोठी पदे मिळतात असे नाही तर छोटी पदे घेऊन कामाचा आवाका दाखवला पाहिजे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी केले.

हडपसर येथील उबाठा गटाचे माजी आमदार महादेव बाबर यांनी आज आपल्या असंख्य पदाधिकाऱ्यांसह पक्षात प्रवेश केला. याशिवाय पुणे, सांगली, हिंगोली, रत्नागिरी, नांदेड, हडपसर येथील विविध पक्षातील अनेक पदाधिकाऱ्यांनी जाहीर प्रवेश केला.

महादेव बाबर यांनी पक्षात येण्याचा चांगला निर्णय घेतला आहे. त्यांनी माझ्यासोबत काम केले आहे. त्यांच्या येण्याने पक्षाची ताकद शहरात वाढली आहे असेही अजित पवार म्हणाले.

लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. अधिवेशन संपल्यानंतर महाराष्ट्राचा दौरा करणार असून त्याअगोदर प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे दौरा करतील असे जाहीर करतानाच आपल्याला बेरजेचे राजकारण करायचे आहे. स्वर्गीय यशवंतराव चव्हाणसाहेबांनी आपल्याला ते शिकवले आहे. त्यामुळे आपल्याकडे असलेल्या वेगवेगळ्या खात्यातून जनसामान्यांची कामे आपण करत आहोत असे अजित पवार यांनी स्पष्ट शब्दात सांगितले.

पक्ष प्रवेश करणार्‍यांनी संघटना बळकट करण्यासाठी अधिकचे प्रयत्न करायचे आहे. याशिवाय सभासद नोंदणीही मोठया प्रमाणात करायची आहे. आपल्याला राष्ट्रवादीचा परिवार म्हणून काम करायचे आहे. राज्यातील प्रत्येक जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसमय करायचा आहे असेही अजितदादा पवार म्हणाले.

पक्षात घेताना कुणाचे वेडेवाकडे धंदे असू नये. त्यांची प्रतिष्ठा चांगली असली पाहिजे. महिला भगिनींचा अनादर होणार नाही याची काळजी घ्यावी. संबंधितांनी कुठेही उर्मटपणे वागता कामा नये असे बजावतानाच शून्यातून विश्व निर्माण करता येते. कुठल्याही गोष्टीचा किंवा कामाचा कमीपणा वाटून घेता कामा नये असा सल्लाही अजित पवार यांनी दिला.

राज्यात विकासाची कामे करत असताना शिव – शाहू – फुले – आंबेडकरांचा सामाजिक समतेचा विचार घेऊन वाटचाल करत असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी दिली.

पक्षाचा वर्धापन दिन पुणे – बालेवाडी येथे साजरा केला. दिवसेंदिवस पक्षात येणार्‍यांची संख्या वाढत आहे. कारण आपले नेतृत्व जनसामान्यांच्या प्रती काम करत आहे. आता हॉल ही कमी पडू लागले असून यापुढे मैदानावर पक्ष प्रवेश घ्यावा लागेल असे सुतोवाच सुनिल तटकरे यांनी केले.

अजितदादांच्या नेतृत्वाखाली पक्ष मजबूत करण्यासाठी, संघटना मजबूत करण्यासाठी काम करु येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत अभूतपूर्व यश मिळेल असा विश्वास सुनिल तटकरे यांनी व्यक्त केला.

या पक्ष प्रवेशाला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे, पक्षाचे कोषाध्यक्ष आमदार शिवाजीराव गर्जे, मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे, आमदार हिरामण खोसकर, आमदार राजू नवघरे, आमदार इद्रीस नायकवडी, आमदार शेखर निकम, प्रदेश सरचिटणीस लतिफ तांबोळी, सांगली जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील, आदींसह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

प्रवेशकर्त्यांची यादी

माजी आमदार मा.श्री. महादेव बाबर, मा. नगरसेवक मा. श्री. योगेश ससाणे, मा. उपमहापौर मा. श्री. बंडू गायक, मा. उपमहापौर मा. श्री. निलेश भगर, मा. नगरसेवेक मा. सौ. हेमलता भगर, मा. स्वि. नगरसेवक मा. श्री. आजित ससाणे, मा. श्री. प्रसाद बाबर, रत्नागिरी – मा.श्री. अजित यशवंतराव, दापोली खेड काँग्रेस पक्ष विधानसभा अध्यक्ष मा.श्री. समद मांडलेकर, म्हापुळ जमाते मुस्लीम उपाध्यक्ष मा.श्री. मुनीम मुकादम. मा.श्री. अशपाक मांडलेकर,

नवी मुंबई काँग्रेसमधील पदाधिकारी

मा.सौ. सविता चव्हाण, मा.सौ. विना राठोड, मा.सौ. देवकी जाधव, मा.सौ. श्वेता जोशी, मा.सौ. योगिता मिक्षा, मा.सौ. उज्ज्वला पंडीत, मा.सौ.मनिषा बस्ताडे, मा.सौ. कल्पना गुप्ता, मा.सौ. सरस्वती यादव, मा. सौ. नमना कुनसे

पलुस तालुका

माजी उपनगराध्यक्ष पलूस नगर परिषद मा. श्री. अशोक सर्जेराव मोरे, संचालक संग्राम वि का सोसायटी पलूस मा. श्री. विजयकुमार पाडुरंग पाटील, युवा उद्योजक मा. श्री. विक्रम सर्वेराय पाटील, मातंग समाज राष्ट्र‌वादी शरदबंद्रजी पवार गट जिल्हाध्यक्ष मा. श्री. विनायक किसान सदामते, युवा नेते मा. श्री. संदिप जयसिग साळुंखे, माजी अध्यक्ष, किसान सेल भाजपा, पलूस तालुका मा. श्री. शिवाजी कृष्णा सावंत, युवा नेते बुर्ली मा.श्री. संतोष काळे, माजी संचालक, वि सोसा, बुर्ली मा.श्री. दिपक वसंत काळे, माजी संचालक, वि सोसा, बुर्ली मा.श्री. राजकुमार अण्णा चौगुले, विर सेवा दल, पलूस लालुका राकेश सतीश चौगुले, सांडगेवाडी ग्रामपंचायत सदस्य मनोज चंद्रकांत पवार, सांडगेवाडी तटामुंक्ती समिती अध्यक्ष मा.श्री. सुधीर शिवाजी जाधव, पलुस तालुका भाजप माजी संघटक मा.श्री. रोहित जलिंदर सूर्यवंशी

खानापुर तालुका

माजी सचिव, भाजपा, सांगली जिल्हा मा. श्री. पंकज (भैय्या) जोतीराम दबडे, माजी प्रदेश उपाध्यक्ष, भाजपा, अनुसूचित मोर्चा मा.श्री. श्री. संदीप (तात्या) मोहन ठोंबरे, माजी उपाध्यक्ष, भाजपा, खानापूर तालुका मा. श्री. आबासो जाधव, माजी अध्यक्ष, भाजपा युवा मोर्चा, विटा शहर मा. श्री. प्रशांत भस्मे, माजी सरचिटणीस, भाजपा युवा मोर्चा, सांगली जिल्हा मा. श्री. प्रथमेश साळुखे, माजी अध्यक्ष, भाजपा ओबीसी मोर्चा, विटा शहर मा. श्री. सुहास कुलकर्णी, माजी अध्यक्ष, भाजपा कामगार आघाडी, विटा शहर मा.श्री. सतीश सुतार,