नीट पेपरफुटीच्या मुद्यावर केंद्र सरकारला कॉकरोच जनता पार्टी आणि विद्यार्थ्यांच्या आंदोलनापुढं नमतं घेत धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा लागला. याचवेळी सरकारनं पेपरफुटीविरोधात सार्वजनिक परीक्षा अयोग्य मार्गांचा प्रतिबंध सुधारणा विधेयक 2026 लोकसभा आणि राज्यसभेत मांडलं. या विधेयकावर लोकसभेत झालेल्या चर्चेला केंद्र सरकारकच्यावतीनं राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी निवेदन केलं. या निवेदनात जितेंद्र सिंह यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर केलेल्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं. राहुल गांधी यांना पंतप्रधान व्हायची महत्त्वाकांक्षा आहे. राहुल गांधी यांनी पंतप्रधान निवासस्थानाबाहेर केलेल्या आंदोलनावर देखील जितेंद्र सिंह यांनी टीका केली. लोकसभेत हे आवाजी मतदानं मंजूर करण्यात आलं.
केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी राहुल गांधी यांनी लोकसभेत अपशब्दांचा वापर केला. विरोधी पक्षनेत्यांना संसदेच्या बेसिक नियमांची माहिती नाही, असं सिंह यांनी म्हटलं. राहुल गांधी यांना सार्वजनिक जीवन आणि प्रशासनिक गोष्टींच्या माहितीचा अभाव असल्याचं उत्तर जितेंद्र सिंह यांनी म्हटलं. कुठंही गोळीबार करण्याचा आदेश दंडाधिकारी, एसडीएम देतात, असं सिंह यांनी म्हटलं. गोळीबार झाला नाही, अश्रूधुराचा वापर केला गेला. त्यामुळं गोळी चालण्याचा आदेश देण्याचा विषय येत नाही, असं जितेंद्र सिंह म्हणाले. गृहमंत्र्यांच्या ताफ्यात 30 वाहनं नसतात, गृहमंत्री कधीच विदेशात गेले नाहीत, असंही सिंह यांनी सांगितलं.
21 जुलै रोजी विरोधी पक्षनेते कोणत्या विचारानं आणि कोणत्या आशेनं पंतप्रधान निवासस्थानाच्या फाटकाबाहेर जाऊन बसले हे माहिती नाही. जेव्हा याच्यावर विचार केला तेव्हा लक्षात आलं की त्यांना बऱ्याच काळापासून वाटतं होतं की देशानं यांना पंतप्रधान करावं आणि 7 लोककल्याण मार्गावर बसवावं. राहुल गांधी यांची ती इच्छा पूर्ण न झाल्यानं पंतप्रधान निवासस्थानाबाहेर जाऊन बसले. राहुल गांधी फोमोमुळं तिथू जाऊन बसले, असं जितेंद्र सिंह यांनी म्हटलं. 7 लोक कल्याण मार्गावर राहण्याची आणि नेता होण्याची इच्छा गेल्या आठवड्यात वेगवेगळ्या प्रकारे बाहेर आल्या, असं सिंह म्हणाले.
राहुल गांधी आणि काँग्रेसला 152 पेपर लीक झाल्याचा आकडा कुठून आणला असा सवाल जितेंद्र सिंह यांनी केला. 2024 च्या पेपरफुटीच्या कायद्यानंतर 52 गुन्हे दाखल झाले आहेत, अशी माहिती देखील जितेंद्र सिंह यांनी दिली.












Leave a Reply