भारताने आशिया कपच्या सामन्यात पाकिस्तानला धुळ चारली आणि दणदणीत विजय मिळवला. पण या विजयानंतर भारतीय संघासाठी अजून एक गुड न्यूज आली आहे. सामना संपल्यावर भारतीय संघाला कोणती आनंदाची बातमी मिळाली, हे आता समोर आले आहे. भारताने पाकिस्तानला या सामन्यात निष्प्रभ केले होते. कारण पहिल्याच चेंडूवर भारताने पाकिस्तानला धक्का दिला. जसप्रीत बुमराहला षटकार मारण्याचे आव्हान देणाऱ्या सैम आयुबला हार्दिक पंड्याने पहिल्याच चेंडूवर बाद केले. त्यानंतर जसप्रीत बुमराहने भारताला दुसरी विकेट मिळवून दिली. यानंतर सामन्यात भारताच्या फिरकीपटूंचा जलवा पाहायला मिळाला. कुलदीप यादव आणि अक्षर पटेल यांनी पाकिस्तानच्या फलंदाजांना आपल्या तालावर नाचवले. त्यामुळेच भारताला पाकिस्तानला १२७ धावांमध्येच रोखता आले. कुलदीपने यावेळी सर्वाधिक तीन विकेट्स मिळवले. भारतासाठी १२८ धावांचे आव्हान माफक होते आणि ते त्यांनी लीलया पेलले. पण हा सामना संपला आणि भारताच्या संघासाठी अजून एक गुड न्यूज आली आहे.
पाकिस्तानचा संघ या सामन्यात भारतीय संघाला दुहेरी धक्का देण्याच्या तयारीत होता. भारत आणि पाकिस्तान यांनी आशिया कपमधील आपले पहिले सामने जिंकले होते. दोन्ही संघांचा हा आशिया कपमधील दुसरा सामना होता. या सामन्यात पाकिस्तानने जर विजय मिळवला असता तर त्यांना भारताला दोन धक्के देता आले असते. एक तर विजयासह त्यांना दोन गुण मिळाले असते आणि ते गुणतालिकेत अव्वल स्थानावर जाऊ शकले असते. त्याचबरोबर भारताला पराभूत करत पाकिस्तानचा संघ सुपर ४ या फेरीत पोहोचू शकला असता. पण भारताने या सामन्यात विजय साकारला आणि त्यांनी गुणतालिकेतील आपले अव्वल स्थान कायम राखले आहे. त्यामुळे पाकिस्तानचा संघ जर आता पुढच्या सामन्यात पराभूत झाला तर त्यांचे आव्हान संपुष्टात येऊ शकते. पण पॉइंट्स टेबलमध्ये अव्वल स्थान कायम राखणे, ही भारताच्या चाहत्यांसाठी गुड न्यूज असणार आहे.भारताने या सामन्यात फक्त विजयच मिळवला नाही, तर त्यांना अजून एक आनंदाची बातमी आता मिळालेली आहे.







