गेल्या २ दिवसांच्या घसरणीनंतर भारतीय शेअर बाजारात आज (९ ऑक्टोबर) जोरदार तेजी दिसून आली. कालच्या नफावसुलीला मागे टाकत बाजार पुन्हा एकदा सकारात्मक स्तरावर बंद झाला. आजच्या ट्रेडिंग सत्रात मेटल, फार्मा आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील समभागांनी उत्कृष्ट कामगिरी केली. बाजार बंद होताना सेन्सेक्स ३९८ अंकांनी वाढून ८२,१७२.१० या पातळीवर स्थिरावला. तर निफ्टी ५० इंडेक्स १३५ अंकांची शानदार वाढ नोंदवत २५,१८१.८० च्या विक्रमी पातळीवर बंद झाला.
आजच्या व्यवहारात जवळपास सर्वच सेक्टर्सनी चांगली कामगिरी केली, मात्र मेटल, फार्मा आणि आयटी सेक्टरचे समभाग सर्वाधिक मजबूत राहिले.
आज टॉप गेनर्समध्ये टाटा स्टील (२.७%), एचसीएल टेक (२.२१%), अल्ट्राटेक सिमेंट (१.५%), बीईएल (१.४७%), सन फार्मा (१.३७%) राहिले तर ॲक्सिस बँक (०.९१%), एचडीएफसी बँक (०.३८%), टायटन (०.४१%), मारुती सुझुकी (०.१७%) हे टॉप लूझर्स होते.






