kshitij Magazine & News

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

या आठवड्यात स्थिरावले सोने-चांदीचे दर !

सोने व चांदीच्या बाजारातील सध्याची स्थिती स्थिरावलेली दिसून येत आहे. गेल्या आठवड्यात सोन्याच्या दरांमध्ये सौम्य चढ-उतार पहायला मिळाले होते. आंतरराष्ट्रीय बाजारात हे दर प्रामुख्याने 3,300 ते 3,350 अमेरिकन डॉलर्स या दरम्यान राहिले, त्यामुळे बाजार स्थिर होता. भारतातील देशांतर्गत बाजारात सोन्याचे दर 97,000 ते 99,000 रुपये प्रति 10 ग्रॅम या दरम्यान राहिले.

चांदीच्या बाबतीत पाहिलं, तर आंतरराष्ट्रीय बाजारातील दर 36 – 37 अमेरिकन डॉलर प्रति औंस या दरम्यान राहिले आणि आजच्या व्यापार सत्रात त्यामध्ये किंचित वाढ नोंदवण्यात आली. देशांतर्गत बाजारात चांदीचे दर 1,10,000 – 1,11,000 रुपये प्रति किलो या दरम्यान राहिले.

,मिळालेल्या माहितीनुसार, आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर 3,300 ते 3,400 डॉलर्स प्रति औंस दरम्यान राहू शकतात. तर देशांतर्गत बाजारात हे दर 98,500 ते 99,500 रुपये प्रति 10 ग्रॅम दरम्यान राहतील. चांदीच्या बाबतीत दर स्थिर राहण्याची शक्यता आहे.