kshitij Magazine & News

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

सोने-चांदीचे भाव कोसळले; सराफा बाजारात ग्राहकांची मोठी झुंबड

जागतिक बाजारपेठेतील घडामोडी आणि गुंतवणुकदारांच्या बदलत्या कलानुसार भारतीय सराफा बाजारात गुरुवारी मोठी खळबळ पाहायला मिळाली. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने उच्चांक गाठणाऱ्या सोने आणि चांदीच्या किमतीत गुरुवारी (5 फेब्रुवारी) मोठी घसरण झाली आहे. विशेषतः चांदीच्या दरात झालेली विक्रमी घट ग्राहकांसाठी मोठा दिलासा मानली जात आहे.

गुरुवारी (5 फेब्रुवारी 2026) सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. 24 कॅरेट सोन्याच्या दरात 50200 रुपये प्रति 100 ग्रॅम इतकी घसरण झाली आहे. यामुळे 100 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 15,94,400 रुपयांवरुन 15,44,200 रुपये इतका झाला आहे. 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याच्या दरात 5020 रुपयांची घसरण झाली आहे. यामुळे हा दर 1,59,440 रुपयांवरुन 1,54,420 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका झाला आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या दरात 46000 रुपये प्रति 100 ग्रॅम इतकी घसरण झाली आहे. यामुळे 100 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 14,61,500 रुपयांवरुन 14,15,500 रुपये इतका झाला आहे. 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याच्या दरात 4600 रुपयांची घसरण झाली आहे. यामुळे हा दर 1,46,150 रुपयांवरुन 1,41,550 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका झाला आहे.

18 कॅरेट सोन्याच्या दरात 37600 रुपये प्रति 100 ग्रॅम इतकी घसरण झाली आहे. यामुळे 18 कॅरेट सोन्याचा 100 ग्रॅम दर 11,95,800 रुपयांवरुन 11,58,200 रुपये इतका झाला आहे. तर 10 ग्रॅम 18 कॅरेट सोन्याच्या दरात 3760 रुपयांनी घसरण झाली आहे. यामुळे हा दर 1,19,580 रुपयांवरुन 1,15,820 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका झाला आहे.

आजचा चांदीचा दर किती?

सोन्यापेक्षाही जास्त चर्चा सध्या चांदीच्या दराची होत आहे. चांदीच्या दरात तब्बल 20,000 रुपयांची मोठी घसरण पाहायला मिळत आहे. औद्योगिक मागणीत झालेली घट आणि आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीच्या साठ्यात झालेली वाढ यामुळे ही घसरण झाली असावी, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. या घसरणीमुळे चांदी आता स्वस्त दरात उपलब्ध होणार असल्याने दागिने आणि भांडी खरेदी करणाऱ्यांसाठी ही मोठी संधी आहे. या घसरणीमुळे चांदीचा दर 3,00,000 रुपये प्रति किलोग्रॅम इतका झाला आहे.