या शुक्रवारी, सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘कौन बनेगा करोडपती 16’ चा एक हास्यविनोदाने आणि हृदयस्पर्शी क्षणांनी भरलेला एपिसोड बघण्यास सज्ज व्हा. सूत्रसंचालनाची धुरा अमिताभ बच्चन यांच्या हातात असलेल्या या कार्यक्रमाच्या शुक्रवारच्या भागात आकर्षक अभिषेक बच्चन, गुणी दिग्दर्शक शूजित सरकार आणि प्रसिद्ध लेखक अर्जुन सेन आपल्या ‘आय वॉन्ट टू टॉक’ या विचार करण्यास प्रवृत्त करणाऱ्या आगामी चित्रपटाच्या प्रचारासाठी येणार आहेत.
अभिषेक नेहमीप्रमाणे आपल्या खास विनोदी शैलीने आणि ऊर्जेने आपली उपस्थिती जाणवून देईल. हा भाग हलकेफुलके क्षण आणि हृदयस्पर्शी संभाषणाने भरलेला असणार आहे. यात बिग बी आणि ज्युनियर बच्चन यांच्यातील खेळीमेळीचे नाते दिसेल. तर मग तयार व्हा मनोरंजन, चातुर्य आणि आत्मियतेने भरलेल्या या रजनीसाठी!
आपण 7 करोड ररुपये जिंकलो तर ती बक्षीसाची रक्कम कुठे जाईल याचा तपशील अभिषेक बच्चन देऊ लागला आणि हास्याची कारंजी फुटू लागली. अर्जुन सेन यांनी सांगितले की ते एअर फोर्स वाईव्ज वेलफेअर असोसिएशन (AFWWA) साठी खेळतील आणि शूजित सरकार यांनी मनाली स्ट्रेज या भटक्या कुत्र्यांना मदत करणाऱ्या NGO ला मदत करण्याची आपली इच्छा व्यक्त केली. अभिषेक हलक्या-फुलक्या शैलीत म्हणाला, “मी कौन बनेगा करोडपती रॅप पार्टी फंडसाठी खेळेन!” खरी मजा तेव्हा आली, जेव्हा ज्युनिअर AB गंमतीत म्हणाला, “जर आम्ही 7 करोड रु. चे बक्षीस जिंकलो, तर मी जाहीर करतो की पुढचे दोन दिवस शूटिंग होणार नाही. आणि आम्ही सुट्टी साजरी करायला गोव्याला जाऊ.” गोवा व्हेकेशनच्या संदर्भामुळे सगळे पोट धरधरून हसले. त्यानंतर अभिषेकने आपल्या वडिलांची ‘7 करोड’चा उल्लेख करणारी ओळ आपल्या वडिलांच्याच आवाजात बोलून दाखवली, त्यावर अमिताभबच्चन सकट सर्व उपस्थितांनी टाळ्या वाजवून त्याला दाद दिली.
या मजेत आणखी भर घालत अभिषेक बच्चनने एका कौटुंबिक परंपरेचा उल्लेख केला, जी बच्चन खानदानात विनोदाचा विषय बनली आहे. अभिषेक म्हणाला, “जेव्हा कुटुंबातले सगळेजण एकत्र जेवायला बसतात आणि कुणीतरी जेव्हा एखाद्या प्रश्नाचे खरे उत्तर देतो, तेव्हा सगळेजण एकत्रितपणे चित्कारतात, ‘7 करोड’! आणि जेवणाच्या टेबलावरचा हा नेहमीचा जोक बनला आहे. या गोड आणि धमाल कौटुंबिक परंपरेतून बच्चन कुटुंबियांची खेळकर बाजू दिसते.
हा व्हिडिओ येथे बघा: https://www.instagram.com/reel/DCWrUWKPSeb/?igsh=bWJ6ZGIzNjNzdnh2
बघायला अजिबात विसरू नका, ‘कौन बनेगा करोडपती 16’चा हा धमाल एपिसोड. अनुभवा अधिक रंजक क्षण, लोभस संभाषणे आणि प्रेरणादायक कथा. या भागात अभिषेक बच्चन, शूजित सरकार आणि अर्जुन सेन ‘आय वॉन्ट टू टॉक’ या आपल्या आगामी चित्रपटाविषयी चर्चा करताना दिसतील.