Breaking News

काटेवाडीत मतदान केल्यानंतर अजितदादा स्पष्टच बोलले , म्हणाले ..

राज्यात आज तिसऱ्या टप्प्यात मतदान होतंय. 11 मतदारसंघात मतदान पार पडतयं.. बारामतीत महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवारांनी अजित पवारांसह कुटुंबासोबत आपला मतदानाचा हक्क बजावला. काटेवाडीत मतदान केल्यानंतर अजित पवारांनी माध्यमांशी संवाद साधला. रोहित पवारांनी ट्विट करत बारामतीत भोरमध्ये मतदारांना पैसे वाटप करण्यात आल्याचा आरोप केलाय. अजित पवार मित्रमंडळाकडून पैसे वाटप होत असल्याचा दावा त्यांनी केलाय. दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवारांनी हे आरोप फेटाळलेत. आरोप करणाऱ्यांचं डोकं फिरल्याचा पलटवार अजित पवारांनी केला आहे.

अजित पवार म्हणाले, सध्या ते आमच्यावर आरोप करत आहे. मी देखील त्यांनी निवडणूक अतिशय चुकीच्या पद्धतीने निवडणुकीची हाताळणी केला असा आरोप करू शकतो. परंतु मी आरोर करणार नाही. ते काहीपण आरोप करत सुटले आहेत. जिल्हा मध्यवर्ती बँक उघडी असल्याचे कोणी पाहिले का? तो व्हिडीओ कालचा होता का? याची कोणी शाहनिशा केली का? समोर आरोप करणाऱ्या व्यक्तीवर परिणाम झाला असून तो काही आरोप करतो. त्या आरोपाला माझ्या दृष्टीकोनातून महत्त्त्व द्यावे असे वाटत नाही. त्याच्या प्रश्नाला उत्तर देण्याची देखील मला गरज वाटत नाही.

बारामती आणि वेल्ह्यात पैसे वाटल्याचा आरोप फेटाळत अजित पवार म्हणाले, हे काम निवडणूक आयोगाचे आहे. मी सात विधानसभा लोकसभा निवडणुका लढवल्या आहेत. आजपर्यंत असे मी कधी केले नाही आणि करणार नाही. कारण नसताना विरोधकांमधील काही बागलबच्चे असे धांदत आरोप करत आहे. मी त्याला महत्त्व देत नाही.

ते म्हणाले, प्रचाराच्या रणधुमाळीत माझ्यावर वेगवेगळ्या आरोपाचा धुराळा उडवला आहे . मी त्या गोष्टीला जास्त महत्त्व देत नाही. मी विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूकीत ही निवडणूक प्रचार केला. या मतदारसंघात आम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केला आहे मी शेवटच्या सभेपर्यंत सांगितले की, ही भावकिची गावकीची निवडणूक नाही. ही निवडणूक देशाचे भवितव्य ठरवणारी तसेच पुढील पाच वर्षाचा विकास हे डोळ्यासमोर ठेवूनच मतदान करा असे मी शेवटपर्यंत सांगितले आहे. आमच्या घरात सर्वात ज्येष्ठ आशाताई अनंतराव पवार आहेत. आज माझी आई माझ्यासोबत आहे याची नोंद सर्वांनी घ्यावी, असे म्हणत अजित पवारांनी टोला हाणला आहे.

राज्यात आज तिसऱ्या टप्प्यात मतदान होतंय. 11 मतदारसंघात मतदान पार पडतयं.. बारामतीत महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवारांनी अजित पवारांसह कुटुंबासोबत आपला मतदानाचा हक्क बजावला. अजित पवार, मुलगा पार्थ पवार काटेवाडी येथील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत त्यांच्या मातोश्री आशाताई पवार यांनी देखील मतदानाचा हक्क बजावला आहे.