आनंद दिघे यांच्या जीवनावर असलेल्या धर्मवीर चित्रपटानंतर धर्मवीर- 2 या चित्रपट आला आहे. धर्मवीर चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर २०२२ मध्ये राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली होती. आता ‘साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट’ हे ब्रीद वाक्य घेऊन ‘धर्मवीर २’ चित्रपट प्रदर्शित झाला. त्या चित्रपटातील एका सीनवरुन वाद निर्माण झाला आहे. या सीनमध्ये ठाण्याच्या रुग्णालयामधून आनंद दिघे यांची डेडबॉडी खांद्यावर घेऊन एकनाथ शिंदे दाखविले आहे. ही घटना खरंच घडली होती का? त्यावर आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहे. त्यावर शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट प्रतिक्रिया दिली. त्यावर आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांनी उत्तर दिले.
आनंद दिघे यांना मारले गेले हे अख्ख्या ठाणे जिल्ह्याला माहिती आहे. ते चांगले ठणठणीत होते. त्यांना दुपारी त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात येणार होती. परंतु अचानक त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. बोलता चालता त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहे. या सर्व गोष्टी काही काळाने पुढे येतील. त्या वेळी लोक संतापले होते. त्या हॉस्पिटला आग लावली असती. हजारो रुग्ण त्या ठिकाणी होते. त्या सर्वांना शांत करण्याचे काम शिवसैनिकांनी केले. त्यात आग्रभागी एकनाथ शिंदे होते. चित्रपटात दाखवले ते सत्य आहे, असा दावा संजय शिरसाट यांनी केला.
संजय शिरसाट म्हणाले, चित्रपट पाहताना घटनाक्रम पाहायला हवे. काही लोकांना असे वाटते की शिवसेना त्यांच्यापासून जन्मली आहे. परंतु शिवसेना बाळासाहेबांनी बनवली आहे. दिघे साहेब यांनी जे घडवले त्यावर पाणी फिरण्याचे काम करतात. आनंद दिघे हे एकनाथ शिंदे यांच्या स्वप्नात आल्याचे दाखवले तर त्याला वेगळा संदर्भ लावू नका.