महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. महाराष्ट्रात विधानसभेसाठी २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. तर २३ नोव्हेंबरला मतमोजणी पार पडणार आहे. प्रत्येक पक्षाने कंबर कसली असून यंदाच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे लागून राहिले आहे. यंदा ही निवडणूक अनेक कारणांनी विशेष ठरली आहे यापैकी एक कारण म्हणजे ठाकरेंविरुद्ध ठाकरे !

मुंबईमध्ये गेल्यावेळेस निवडणुकीत ठाकरे घराण्याचा पहिला व्यक्ती निवडणूक लढवत होता. उद्धवपुत्र आदित्य ठाकरे हे वरळीतून उभे राहिले होते तर यावेळी राजपुत्र अमित ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. आदित्य ठाकरे देखील पुन्हा वरळीमधून निवडणूक लढणार असल्याची शक्यता आहे.

मागच्यावेळेस निवडणुकीत ठाकरे घराण्याचा पहिला व्यक्ती निवडणूक लढवत होता म्हणून राज ठाकरेंनी वरळीतून उमेदवार देणार नाही अशी भूमिका घेतली होती. याची राज्यभरात स्तुती झाली होती. परंतू यंदाच्या निवडणुकीत राज यांनी वरळीतून उमेदवार दिला आहे. यंदाही आदित्य ठाकरे वरळीतून लढण्याची शक्यता आहे. अशावेळी, मनसेने संदीप देशपांडेंना उमेदवारी देऊन मोठे आव्हान उभे केले आहे.

राज ठाकरेंचे पूत्र अमित ठाकरे हे माहिममधून उभे ठाकले आहेत. गेल्या काही दिवसांपासून याबद्दलची चर्चा होती. त्यानंतर आता दुसऱ्या यादीमध्ये अमित ठाकरे यांचे नाव जाहीर झाले आहे. ठाकरे घराण्यातले दुसरे पुत्र अमित ठाकरे हे विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरलेले आहेत.

ठाकरे गटाचे उमदेवार आणि मनसेचे उमेदवार हे एकमेकांना सामोरे जातीलच. तसेच, वरळीचा मतदार संघ ठाकरे गट राखणार की मनसे ताब्यात घेणार ?, अमित ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यामुळे माहीम मतदारसंघातली गणित फिरणार का ? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *