kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

मोठी बातमी ! शरद पवारांची उमेदवारांशी तातडीने ऑनलाईन मिटिंग ; काय घडतंय पवार गटात?

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या निकालाचे काऊंटडाऊन सुरु झाले आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालाला अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. यामुळे उमेदवारांच्या चिंतेत वाढ झाली आहे. तर दुसरीकडे उद्या कोण विजयाचा गुलाल उधळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. आता विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर राज्यात महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत. त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते शरद पवारांनी उमेदवारांना महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत.

राज्यात विधानसभा निवडणुकांची धामधूम सुरु आहे. बुधवारी २० नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात मतदान पार पडले. यानंतर आता २३ नोव्हेंबरला राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे आता विधानसभा निवडणूक निकालाची उत्कंठा राजकीय नेते, कार्यकर्त्यांनाच नाही तर सर्वसामान्यांनाही लागली आहे. यंदाच्या निवडणुकीत महायुती आणि महाविकासआघाडी या दोघांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. त्यातच आता शरद पवारांनी एक महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार उपस्थितीत होते.

आता नुकतंच विधानसभा निवडणुकांच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाच्या उमेदवारांची ऑनलाईन बैठक पार पडली. या बैठकीत शरद पवार, जयंत पाटील, सुप्रिया सुळे या वरिष्ठ नेत्यांनी उमेदवारांना मार्गदर्शन केले. यावेळी उमेदवारांना निकालाच्या पार्श्वभूमीवर काही महत्त्वाच्या सूचनाही देण्यात आहे.

यावेळी शरद पवारांनी महाविकासआघाडीला १५७ जागा मिळतील असा विश्वास व्यक्त करण्यात आला. तसेच शरद पवारांनी सर्व उमेदवारांना निकालानंतर प्रमाणपत्र घेऊन थेट मुंबई गाठा, अशीही सूचनाही दिली.

तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एक्शन मोडमध्ये आले आहेत. त्यांनी आपल्या एका विश्वासू नेत्यावर अपक्ष उमेदवारांची जुळवाजुळव करण्याची जबाबदारी सोपवली आहे. साम, दाम, दंड, भेद वापरून सरकार बनवण्याच्या तयारीत महायुती आहे. तसेच देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करण्यासाठी भाजप नेते सक्रीय झाल्याची माहिती आहे. देवेंद्र फडणवीसांनी पालघर, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील आपल्या जवळच्या नेत्यांना सक्रिय केल्याची माहिती आहे. त्यांच्यावर भाजपला पाठिंबा देण्यासाठी अपक्ष आमदार जमवाजमवीची जबाबदारी देण्यात आली आहे.