देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग याचं निधन झालं आहे. वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर देशातून नव्हे जगभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील ट्विट करत शोक व्यक्त केलाय. तसंच भारतानं एक प्रतिष्ठित नेता गमावल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.
नेमकं काय आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे ट्विट?
भारताने आज सर्वात प्रतिष्ठित नेते डॉ. मनमोहन सिंग यांना गमावलं. सामान्य पार्श्वभूमी असताना त्यांनी देशाच्या अर्थमंत्री पदापर्यंत त्यांनी झेप घेतली. अर्थमंत्रीच नव्हे तर त्यांनी सरकारी यंत्रणेत अनेक महत्त्वाच्या पदांचा कारभार पाहिला. अनेक वर्षे देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी आपलं योगदान दिलं, आपली छाप सोडली.संसदेतील त्यांचा वावर अभ्यासपूर्ण होता. आपल्या पंतप्रधान या नात्याने त्यांनी लोकांचे जीवन सुधारण्यासाठी व्यापक प्रयत्न केले.
अशा शब्दांत नरेंद्र मोदी यांनी मनमोहन सिंग यांच्या आठवणी जागवल्या तसंच श्रद्धांजली वाहिली आहे.