भाजपचे माजी खासदार परवेश वर्मा यांनी आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांचा पराभव केला आहे. मी दिल्लीच्या जनतेचे आभार मानतो. हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विजय आहे. अशी प्प्रतिक्रिया त्यांनी दिली. विजयानंतर वर्मा यांनी ‘जयश्री राम “असे ट्विट केले.
नवी दिल्ली मतदारसंघातील भाजप उमेदवार परवेश वर्मा यांच्या पत्नी स्वाती सिंग वर्मा म्हणाल्या की, आजच्या विजयाने लोकांचा भाजप आणि पंतप्रधान मोदींवर विश्वास असल्याचे दिसून येते. वर्मा मुख्यमंत्री होणार का ? याबाबत बोलताना स्वाती सिंग म्हणाल्या, “आमचे काम नवी दिल्ली मतदारसंघातून भाजपला जिंकवून देणे हे होते. आम्ही आमचे काम उत्तम प्रकारे केले आहे.