आशिया चषक 2025 च्या स्पर्धेत भारताने पाकिस्तानचा 5 विकेट्सने पराभूत केला. दरम्यान 28 सप्टेंबर रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात अंतिम सामना खेळवण्यात आला. या स्पर्धेला संपवून 3 दिवस उलटले असले तरी आशिया चषकाची अद्यापही जोरदार चर्चा सुरु आहे. याचदरम्यान, आशिया चषकात पाकिस्तानने भारताचा पराभव केला असता तर एक प्लॅन तयार करण्यात आला होता. याबाबत शाहीद अफ्रिदीने माहिती दिली आहे. पाकिस्तानने अंतिम सामन्यात भारताला पराभूत केले असते तर पाकिस्तान संघ हा विजय पाकिस्तानी हवाई दलाला समर्पित करणार होता, असं पाकिस्तानचे माजी कर्णधार शाहीद आफ्रिदी आणि मुहम्मद युनूस यांनी सांगितले.
आशिया कप जिंकल्यानंतर सूर्यकुमार यादवन माध्यमांशी संवाद साधला. यावेळी, “मी व्यक्तिगत सर्व 7 सामन्यांचे शुल्क भारतीय लष्कराला देणार आहे. थोडा उशीर झाला. पण मी जे हे योगदान देत आहे. त्याचा मला अभिमान वाटत आहे,” असल्याचं सूर्यकुमार यादवने सांगितले.
पाकिस्तानने विजयासाठी दिलेल्या 147 धावांचा पाठलाग करताना भारताची सुरुवात काहीशी खराब झाली. दुसऱ्या ओव्हरमध्येच इनफॉर्म बॅट्समन अभिषेक शर्मा आऊट झाला. फहीम अशरफने त्याला आऊट केले. शुभमन गिलने 10 चेंडूत 12 धावा केल्या. तर सूर्यकुमार यादव या सामन्यातही फ्लॉप राहिला, 5 चेंडूत फक्त 1 रन करून आऊट झाला. यानंतर संजू सॅमसन आणि तिलक वर्मा यांनी अर्धशतकीय भागीदारी करत भारताचा डाव सावरला. मात्र 13व्या ओव्हरमध्ये अबरारने संजू सॅमसन (24) ला आऊट केले. यानंतर शिवम दुबे आणि तिलक वर्मा यांनी पुन्हा एक अर्धशतकीय भागीदारी केली. एक टप्प्यावर भारताला जिंकण्यासाठी फक्त 2 ओव्हरमध्ये 17 धावा लागत होत्या. अंतिम ओव्हरमध्ये 10 धावा हव्या होत्या आणि विजयी शॉट रिंकू सिंगने मारत भारताने सामना जिंकला. या सामन्यात भारतासाठी तिलक वर्माने 53 चेंडूत 69 नाबाद धावा केल्या त्याने 3 चौकार आणि 4 षटकार मारले आणि भारतीय विजयाचा शिलेदार ठरला.
कोणत्या खेळाडूंना कोणते पुरस्कार मिळाले?, वाचा यादी:
गेम चेंजर – शिवम दुबे – 3500 डॉलर्स
सर्वाधिक षटकार – तिलक वर्मा – 3500 डॉलर्स
फायनलचा सर्वोत्कृष्ट खेळाडू – तिलक वर्मा – 5000 डॉलर्स
मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर – कुलदीप यादव – 15000 डॉलर्स
प्लेयर ऑफ द सीरीज – अभिषेक शर्मा – 15000 डॉलर्स













