उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर बारामती विधानसभेची जागा रिक्त झाली, त्यानंतर सुनेत्रा पवार यांनी ही निवडणूक लढवली. राहुरीचे आमदार शिवाजी कर्डिले यांचं निधन झाल्यानंतर राहुरीची डागा रिक्त झाली, त्याची पोटनिवडणूक कर्डिले यांचे सुपुत्र अक्षय कर्डिले यांनी लढवली असून आज या दोन्ही पोटनिवडणुकांचाही निकाल लागणार आहे. आज सकाळी बारामती पोटनिवडणुकीच्या मतमोजणीला सुरूवात झाली असून सुनेत्रा पवार या 36591 मतांनी आघाडीवर आहेत.
तर भाजपचे अक्षय कर्डीले हे देखील जवळपास आघाडीवर आहेत. पहिल्या फेरीत 4266 मतांनी आघडीवर असलेल्या कर्डिले यांनी दुसऱ्या फेरीअखेरीसही मोठी आघाडी कायम ठेवली. दुसऱ्या फेरीअखेरीस भाजपच्या अक्षय कर्डिले यांना 11071मतं तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे गोविंद मोकाटे यांना – 1434मत मिळाली असून सध्या अक्षय कर्डिले हे 9637 मतांनी आघाडीवर आहेत. दुस-या फेरीअखेर एकुण 20476 मतांची मोजणी झाली.













Leave a Reply