सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील इंडियन आयडॉल या अत्यंत लोकप्रिय गायन रियालिटी शो चे 15 वे सत्र ग्रँड फिनालेच्या दिशेने वाटचाल करत आहे. या सत्राच्या प्रवासाचा परमोत्कर्ष साधणारा या वीकएंडचा भाग 90 च्या दशकातील सुमधुर बॉलीवूड गीतांनी दुमदुमणार आहे. परीक्षक श्रेया घोषाल, बादशाह आणि विशाल ददलानी यांच्या उपस्थितीत अंतिम फेरीत पोहोचलेल्या स्पर्धकांचे एकापेक्षा एक सरस परफॉर्मन्स यावेळी बघायला मिळतील.
स्पर्धक स्नेहा शंकर हिच्यासाठी हा फिनाले तिच्या कारकिर्दीला वेगळे वळण देणारा ठरणार आहे. भारतीय संगीत क्षेत्रातील एक दिग्गज कंपनी टी-सिरीज कडून स्नेहाला एक नामी संधी प्राप्त होताना दिसेल. एका हृदयस्पर्शी व्हिडिओ संदेशात, टी-सिरीजचे मॅनिजिंग डायरेक्टर श्री. भूषण कुमार यांनी स्नेहाचा विशेष उल्लेख करत म्हटले की, “स्नेहा शंकर, तुझा मी विशेषत्वाने उल्लेख करतो की, या संपूर्ण सीझनमध्ये तू खूप मनःपूर्वक गायलीस. तुझे सगळे परफॉर्मन्स मला आठवत आहेत.” तिच्या असामान्य प्रतिभेचे आणि निष्ठेचे कौतुक करताना ते म्हणाले, “या उद्योगातील अनेक महान गायकांनी गायलेली गाणी तू या मंचावर सादर केलीस. तुझी उत्कटता, निष्ठा आणि परिश्रम यांची कदर करण्यासाठी मी तुला टी-सिरीज सोबत एक करार करण्याची ऑफर देत आहे. टी-सिरीज परिवारात तुझे स्वागत आहे.” भारतातील एका आघाडीच्या संगीत कंपनीकडून मिळालेली ही ऑफर म्हणजे स्नेहाच्या विलक्षण प्रतिभेला मिळालेली दाद आहे आणि या उदयोन्मुख गायिकेसाठी स्वप्न साकार होण्याचा क्षण आहे!
इंडियन आयडॉल 15 चा ग्रँड फिनाले अजिबात चुकवू नका, ज्यामध्ये संगीत, जुन्या सुमधुर आठवणी आणि स्पर्धकांची स्वप्ने यांच्या मिलाफातून एक अविस्मरणीय रजनी रंगणार आहे! या शनिवारी आणि रविवारी ही संगीत रजनी उलगडताना अवश्य बघा रात्री 8:30 वाजता फक्त सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजन आणि सोनी लिव्हवर!
Leave a Reply