kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातील जनतेने तुम्हाला जागा दाखवली – जितेंद्र आव्हाड

लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातील जनतेने तुम्हाला तुमची जागा दाखवून दिली. निरेटिव्ह आम्ही सेट नाही करत लोक सेट करत असतात असा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषदेमधून अजित पवार गटावर केला आहे.

जितेंद्र आव्हाड म्हणाले की, आज झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये तटकरेंनी माझा नाव घेतल नाही. पण मी अजित पवारांच नाव घेतल असा उल्लेख त्यांनी केला. मात्र अजित पवारांच नाव घेऊन माझ्यावर तटकरेंनी हल्ला केला ते त्यांची सवय आहे. त्यांनी त्यांच्या पक्षाकडे बघाव त्यांच्या पक्षांमध्ये काय सुरू आहे. असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.

पुढे जितेंद्र आव्हाड म्हणाले की, सुनिल तटकरे शरद पवार साहेब यांच्या मागे लागले होते. भाजपमध्ये जाण्यासाठी त्यामुळे साहेबांनी त्यांना तारखा दिल्या. साहेबांकडे २००९ ला तुम्ही फॅार्म्युला दिला होता तसेच २०१४ ला सुद्धा तुम्हीच भाजपमध्ये जाण्यासाठी साहेबांच्या मागे लागले होते आणि २०१९ मध्ये देखील तुम्हीच फॅार्म्युला आणला होता भाजपमध्ये जाण्यासाठी असेही जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टपणे सांगितले.

जितेंद्र आव्हाड म्हणाले की, तुम्ही विचारधारा सोडली त्यामुळे तुमचे हे हाल होत आहे. आज तुमच्या पक्षाबद्दल आरआरएस म्हणत आहे. तुमचा पक्ष ओझे झालं आहे. मात्र तुम्ही आरआरएसला उत्तर देऊ शकत नाही जर तुमच्यात हिम्मत असेल तर आरआरएसला उत्तर द्या अस आव्हान देखील यावेळी जितेंद्र आव्हाडांनी तटकरेंना दिल आहे.